लूक बदलण्याचा विचार ‘या’ मुलीला पडला महागात, जगातील सर्वात मोठे ओठ असलेली महिला?

Lip Filler : चेहऱ्याचे सौंदर्य (Beauty) वाढवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. सौंदर्याचे प्रमाण प्रत्येकासाठी वेगळे असते. यासाठी काहीजण घरगुती उपायांचा अवलंब करताना दिसतात, तर काहीजण त्वचेसंदर्भात वेगवेगळे उपचार घेतात. तुम्हाला महितीये का, जगातील सर्वात मोठे ओठ असलेल्या महिलेबद्दल. जगातील सर्वात मोठ्या ओठांच्या यादीत अँड्रिया जेरेमियाचे (Andrea Jeremiah) ओठ (Lips) येतात. तुम्ही कधी मोठे ओठ असलेली स्त्री पाहिली आहे का? तुम्ही पाहिले नसेल आम्ही तुम्हाला सांगतो की, सुंदर दिसण्यासाठी अनेकदा अनेक शस्त्रक्रिया केल्या जातात. 

अशा परिस्थितीत, शस्त्रक्रिया (Plastic Surgery) अयशस्वी झाल्यामुळे अनेक वेळा आपल्या शरीराला इजा होते. असंच काहीसं अँड्रिया जेरेमियासोबत झाले तिने आपले ओठ मोठे करण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या पण काही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे तिच्या ओठांचे रुपच बदलले. त्याच वेळी, शस्त्रक्रियेपूर्वी आणि आताचा चित्रात अँड्रिया जेरेमियाला ओळखणे खूप कठीण होते. आंद्रिया जेरेमियाने 2018 सालापासून आपला लूक (Look) बदलण्याचा विचार केला. तिला माहित नव्हते की तिची ही इच्छा तिचे ओठ खराब करेल. (Andrea Jeremiah biggest lips in the world Thought to change the look getting ready for another surgery nz)

हेही वाचा :  जगातील सर्वात मोठं मांजर कुठे आहे पाहा... फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

 

ओठांमुळे श्वास घेण्यास त्रास 

अँड्रिया जेरेमियाचे ओठ इतके विकृत झाले आहेत की जो कोणी तिला पहिल्यांदा पाहतो तो घाबरतो. त्याचबरोबर ओठांमुळे तिला श्वास घेण्यासही त्रास सहन करावा लागत आहे. 2018 मध्ये तिने लिप फिलर्स केले. त्यानंतर आतापर्यंत त्याने 32 पेक्षा जास्त वेळा लिप फिलरचा (Lip Filler) वापर केला आहे.

ओठांवर 8 लाख रुपये खर्च 

भारतीय चलनानुसार, अँड्रिया जेरेमियाने तिच्या ओठांवर सुमारे 8 लाख रुपये खर्च केले आहेत. याशिवाय तिचा बराचसा पैसा वाया गेला आहे. अँड्रिया जेरेमियाला तिचे मोठे ओठ आवडतात. तिला पुन्हा लिप फिलर्स करून घ्यायचे आहेत.अँड्रिया इव्हानोव्हा म्हणते की तिला वाटते की तिच्याकडे जगातील सर्वात मोठे ओठ आहेत. मात्र, असे असूनही तो थांबू इच्छित नाही. तिला अजून मोठे आणि वारंवार फिलिंग मिळत राहायचे आहे. त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की आता डॉक्टरांनी देखील सांगितले आहे की यापेक्षा जास्त फिलिंग करू नका, परंतु आंद्रिया थांबू इच्छित नाही.  अँड्रियाने ब्रेस्ट इम्प्लांट (Breast Implant) केले होते. त्याचा फोटो अँड्रियाने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तिच्या चाहत्यांसह शेअर केला होता.

हेही वाचा :  होळी पार्टीसाठी घराची सजावट, ५ होम डेकोरेशन टिप्स

आंद्रिया जेरेमिया ही बल्गेरियाची

बार्बी डॉलसारखी (Baby Doll) दिसण्याची आकांक्षा असलेली अँड्रिया जेरेमिया केवळ 23 वर्षांची आहे. बल्गेरियातील (Bulgaria) रहिवासी असलेल्या आंद्रिया जेरेमिया हिच्या केवळ ओठांवरच नव्हे तर गाल आणि हनुवटीवरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या मोठ्या ओठांमुळे तिच्या नाकपुड्याही बंद झाल्या आहेत. त्याचबरोबर मोठे ओठ असल्याने त्यांना खाण्यातही अडचणींचा सामना करावा लागतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …