होळी पार्टीसाठी घराची सजावट, ५ होम डेकोरेशन टिप्स

Home Decoration Tips For Holi: होळीसाठी आपण अनेक ठिकाणी पार्टीला जात असतो तर आपल्या घरीही पार्टी करत असतो. तुम्ही यावर्षी तुमच्या घरी होळी पार्टी करणार असाल आणि Home Decoration नक्की कसं करायचं अगदी कमी वेळ राहिलाय या विचारात असाल तर आम्ही तुमची मदत करायला आलोय.

होळी हा रंगांचा सण घरात साजरा करण्यासाठी घराची सजावट अगदी सोप्या पद्धतीने करा. घर सजवायला कदाचित जास्त वेळ नाहीये. पण तरीही या टिप्समुळे पाहुणे तुमची प्रशंसा करताना थकणार नाहीत. काही सोप्या होम डेकोरेशन टिप्स होळीच्या दिवशी तुमच्या घराला चारचाँद लावतील हे नक्की. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​फुलांचा वापर​

​फुलांचा वापर​

Use Flowers For Holi Decoration: सण कोणताही असो फुलांची सजावट कधीच चुकीची ठरत नाही. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर फुलं हा उत्तम पर्याय ठरतो. होळीच्या रंगबेरंगी सणाला रंगबेरंगी फुलांची सजावट करावी. तुमचे घर सकारात्मक दिसते आणि होळीचा जल्लोषही दिसून येतो. तसंच फुलांच्या सुगंधाने घर मोहरून जाते. याशिवाय तुम्ही आर्टिफिशियल फुलांचाही आधार घेऊ शकता.

हेही वाचा :  'राजकीय वारसदार मुलगा हवा!' पवार साहेबांनी तेव्हा दिलेले उत्तर आजही डोळ्यात अंजन घालणारे

​भिंती सजवा​

​भिंती सजवा​

Use Wallpaper For Holi Decoration: होळीच्या सणाला तुम्ही घराच्या भिंती सजविण्यासाठी वॉलपेपरची मदत घेऊ शकता. ऑनलाईन ऑर्डर करू शकता अथवा वेळ नसेल तर स्टोअर्समधून वॉलपेपर्स आणून तुम्ही सजवू शकता. तसंच होळीसाठी तुम्ही लाईट कलर वॉलपेपर आणा आणि मग भिंती सजवा.

(वाचा – समुद्रकिनाऱ्याची रोज अनुभूती, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या आलिशान घरातून दिसतो अथांग समुद्र)

​पडदे आणि उशांची कव्हर्स बदला​

​पडदे आणि उशांची कव्हर्स बदला​

Change Cushion Covers And Curtains: होळीसाठी घराला वेगळा लुक देण्यासाठी तुम्ही घरातील पडदे आणि उशांची कव्हर्स बदला. होळीच्या सणासाठी फ्लोरल प्रिंट्स, Abstract Prints असणारे पडदे निवडा. तसंच सोफा कव्हर्स आणि रंगबेरंगी बेडशीट्सचा वापर करा. यामुळे घर अधिक आकर्षक दिसते आणि होळीच्या डेकोरेशनचा वेगळाच फील येतो.

(वाचा – Holi Stains: होळीच्या रंगाचे कपड्यांवरील डाग घालवा त्वरीत, सोप्या टिप्सचा करा वापर)

​फुग्यांची घ्या मदत​

​फुग्यांची घ्या मदत​

Use Balloons For Holi Decoration: होळीसाठी घरात रंगबेरंगी लुक देण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे फुगे. तुमच्याकडे वेळ नसेल तर घराची सजावट करण्यासाठी रंगबेरंगी फुग्यांची मदत घ्या. मुख्य दरवाजापासून ते खिडक्या, भिंतींवर तुम्ही फुग्यांनी सजवू शकता. वेगवेगळ्या पद्धतीचे फुगे आजकाल मिळतात. त्याचा वापर करून घ्या.

हेही वाचा :  होळीचे रंग आणि Chronic Obstructive Pulmonary Disease

(वाचा – Living Room सजवण्याच्या सोप्या ७ पद्धती, लहान जागाही भासेल मोठी)

​वॉल हँगिंग्जचा करा वापर​

​वॉल हँगिंग्जचा करा वापर​

Wall Hangings For Holi Decoration: वॉल हँगिंग्जचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने घर सजवू शकता. होळीसाठी जर तुम्हाला क्राफ्टवर्क येत असेल तर वॉल हँगिंग्ज करणे अधिक सोपं होईल. कलरफुल सँड पेपर्स बनविण्यापासून ते बीड्स आणि फेदर्सचा वापर करून घराला वेगळा लुक देऊ शकता.
होळीसाठी घर सजवायला वेळ नसल्यास, या सोप्या आणि पटकन होणाऱ्या टिप्स वापर करा आणि होळी पार्टीत धमाल करा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …