Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू

Brain Eating Amoeba virus : मागीन दोन वर्षे कोरोना (Corona) विषाणूने जगभराचं जगणं मुश्किल केले होते. लाखो लोकांचा बळी घेतल्यानंतर आता नव्या विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अमेरिकेत (Florida USA) मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर (Brain-Eating Amoeba Deaths) खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूनंतर (Corona Virus) नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोक घाबरले आहेत. अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या मृत्यूनंतर फ्लोरिडाच्या प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शार्लोट काउंटीमधील एका व्यक्तीचा फेब्रुवारीमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे मृत्यू झाला होता. याला नैग्लेरिया फॉलेरी असेही म्हणतात. या मृत्यूनंतर फ्लोरिडा आरोग्य विभागाने शार्लोट काउंटीमधील लोकांसाठी इशाराही जारी केला आहे. यापूर्वीही दक्षिण कोरियाच्या एका नागरिकाचा मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती थायलंडच्या सहलीवरून मायदेशी परतली होती. 

दुसरीकडे फ्लोरिडा आरोग्य विभागाने अद्याप मृत व्यक्तीबाबत माहिती दिलेली नाही. मात्र हा मृत्यू फेब्रुवारीच्या अखेरीस झाल्याचे सांगितले आहे. यासोबत लोकांनी फक्त फिल्टर केलेले पाणी प्यावे, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला नळाचे पाणी प्यावे लागत असेल तर ते किमान एक मिनिट उकळवा आणि प्या. जेणेकरून त्यातील जंतू पूर्णपणे मरून जातील, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा :  VIDEO: अजगर आणि मगरीची खतरनाक झुंज कॅमेऱ्यात कैद; कोण जिंकले असेल?

कसा झाला मृत्यू?

फ्लोरिडा आरोग्य विभागाने माहिती दिली आहे की, मेंदू खाणारा अमिबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेग्लेरिया फॉलेरी नावाच्या विषाणूमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. “नाएग्लेरिया फॉउलरीचा संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे आणि जेव्हा अमीबाने दूषित पाणी नाकातून शरीरात प्रवेश करते तेव्हाच हा आजार होऊ शकतो. दूषित पाणी नाकात गेल्यावरच हा संसर्ग होऊ शकतो, दूषित पाणी पिऊन व्यक्तीला संसर्ग होणार नाही,” असे ट्विट फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

मृत्यू झालेली व्यक्ती टाकीच्या पाण्याने नाक साफ करत होता. त्यावेळीअमिबा पाण्यातून अमिबा नाकावाटे व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचला. या संसर्गामुळे त्यांच्या मेंदूला सूज आली होती. नंतर त्या व्यक्ती मृत्यू झाला.

या विषाणूची लक्षणं काय आहेत?

या विषाणूची लागण झाल्यास सुरुवातीच्या डोकेदुखी, ताप, मळमळ, उलट्या, संतुलन गमावणे, दिशाभूल होणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे जाणवू लागतात. जर परिस्थिती आणखी बिघडली तर ती व्यक्ती कोमातही जावू शकते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …