ICSI CS December Result 2021: सीएस डिसेंबर २०२१ निकालाची तारीख जाहीर

ICSI CS December Result 2021: आयसीएसआय सीएस डिसेंबर २०२१ निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (Institute of Company Secretaries of India) या तारखा प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह कोर्स (Professional and xecutive course) साठी आहेत. संस्थेकडून जारी झालेल्या नोटीसनुसार निकाल २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी डिसेंबर २०२१ परीक्षा दिली आहे, ते icsi.edu वर जाऊन निकाल तपासू शकतात.

अधिकृत नोटिसनुसार, प्रोफेशनल अभ्यासक्रमांचे निकाल २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घोषित केले जाणार आहेत. एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाचे निकाल (Executive Programme result) एकाच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत जाहीर केले जातील. निकालासह उमेदवारांचा वैयक्तिक निकाल विषयनिहाय संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

एक्झिक्युटिव्ह प्रोगाम (जुना आणि नवा अभ्यासक्रम) परीक्षांचा औपचारिक ई निकाल आणि गुण उमेदवारांनी डाऊनलोड करण्यासाठी निकालाच्या घोषणेनंतर तत्काळ संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील. निकाल जाहीर झाल्यानंतर ते उमेदवारांना देखील पाठवले जातील.

याव्यतिरिक्त, प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोगामसाठी पुढील परीक्षा १ ते १० जून, २०२२ पर्यंत आयोजित केली जाईल. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया २६ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. या व्यतिरिक्त, परीक्षेसंबंधातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना ऑफिशिअल वेबसाइटला भेट द्यावी. सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल डिसेंबर २०२१ ची परीक्षा २१ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालासंबंधीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

हेही वाचा :  CS December Result 2021: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्ह डिसेंबरचा निकाल 'येथे' पाहा

UGC NET निकालासंदर्भात यूजीसीकडून अधिकृत अपडेट, जाणून घ्या

IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
SSC CGL 2020 Answer Key: एसएससी सीजीएल टीयर २ परीक्षेची उत्तरतालिका जारी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …