एक अनोखं हॉटेल जिथे प्रत्येक गोष्ट बनलीये Condom ची; खाल्ल्यानंतर ग्राहकांना मिळतं फ्री कंडोम

condom Cafe : आजकाल लोकं खाण्यासाठी विविध आणि नवीन ठिकाणांचा शोध घेतात. हॉटेलमधील खाण्यासोबत आपण तिथला अँबियन्सही तपासतो. कोणत्या हॉटेलमध्ये कसं इंटीरीयर आहे, हे अनेकदा आपण इंटरनेटवर बघून जातो. पण आज आम्ही तुम्हाला ज्या हॉटेलबद्दल सांगणार आहोत, त्याचं इंटीरियर आरसा, बाहुल्या किंवा देशविदेशाची थीम नसून कंडोमचं आहे. हे वाक्य वाचून तुमचे डोळे विस्फारले असतीलचस पण हो…. हे हॉटेल कुटुंब नियोजनासाठी वापरल्या जाणार्‍या कंडोमने सजवलंय. 

कंडोम रेस्टॉरंट कुठे आहे

Cabbages and Condoms रेस्टॉरंट Bangkok मधील 10 सुखुमवित सोई 12 मध्ये आहे. हे हॉटेल दररोज सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत खवय्यांसाठी खुलं असतं. याशिवाय थायलंडमधील पट्टाया, क्राबी आणि चियांग राय या ठिकाणी देखील अशी हॉटेलं आहेत. इतकंच नाही तर युकेमध्ये एक कॅबेज आणि कंडोम रेस्टॉरंट देखील आहे. जेवणाव्यतिरिक्त हे हॉटेल आपल्या अनोख्या इंटेरिअरमुळे चर्चेत राहते.

या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले स्टेच्यू. सांताक्लॉज, त्याची दाढी आणि या कॅफेमधील दिवेही कंडोमचे बनवलेले आहेत. अगदी कॅफेमधली टेबलंही कंडोमनेच तयार करण्यात आली आहेत. इतकंत नाही तर यामध्ये येणाऱ्या ग्राहकांना जेवणानंतर फ्री कंडोम दिले जातात. कॅफेच्या आतील बाजूला कंडोम थीम असलेला एक फोटो बूथही आहे.

हेही वाचा :  Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त...', अजित पवारांवर खोचक टीका!

कंडोम रेस्टॉरंटचा विचार का आला?

कौटुंबिक नियोजनाची चांगली समज लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून Cabbages and Condoms रेस्टॉरंट तयार केलं गेलंय. थायलंडमध्ये तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला कोबी मिळेल. Cabbages and Condoms चे अध्यक्ष मेचाई विरवैद्य यांच्या मतानुसार, कंडोम हे कोबीसारखं असलं पाहिजे जे सर्वव्यापी आणि सर्वांसाठी उपलब्ध व्हावं. याच कल्पनेचा विचार करता कल्पना हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलंय.

हॉटेलमध्ये मेन्यू देखील खवय्यांच्या आवडीचा

या रेस्टॉरंट्चं इंटीरीयर आह तर याठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ देखील उत्तमच आहेत. इथल्या काही खास डिशेस म्हणजे थाय, चिकन, बीफ तसंच एक विशिष्ट करी. याशिवाय इथला स्टीकी राईस आणि डीप फ्राय आईस्क्रीम देखील लोकांचं फेवरेट आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …