काचेचा रंग फाडतो डोळ्यांतलं नाजुक बुबुळ, डॉ सांगितले 5 भयंकर नुकसान व बचावासाठी उपाय

Holi Colors 2023 रंगपंचमीचा उत्सव अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या भारतातील हा एक उत्साहाचा सण, जो अवघ्या भारतभर मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावून लोक यावेळी शुभेच्छा देतात आणि या दिवशी सर्वांचेच आयुष्य कलरफुल होवो अशी मनोकामना करतात. पण या रंगाच्या उत्सवाची एक हानिकारक बाजू आहे ती म्हणजे केमिकलयुक्त रंग होय!

केमिकल्सनी भरलेल्या रंगांचे मोठे दुष्परिणाम आहेत. जे रंगांचा बेरंग करू शकतात. नॉयडामधील ‘कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर कपिल त्यागी यांच्या मते, रंगांशी खेळताना काळजी न घेतल्याने ऍलर्जीपासून श्वसनाच्या संसर्गापर्यंत मोठमोठ्या आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. होळीच्या रंगांमध्ये विविध केमिकल्स असतात, ज्यामुळे डोळे, त्वचा, किडनी आणि लिव्हर यांसारख्या अंतर्गत अवयवांनाही हानी पोहोचते. (फोटो सौजन्य :- iStock)

हानिकारक केमिकल्सने भरलेले असतात रासायनिक रंग

हानिकारक केमिकल्सने भरलेले असतात रासायनिक रंग

होळीचे रासायनिक रंग हे पारा, एस्बेस्टोस, सिलिका, अभ्रक आणि शिसे यांसारख्या घातक रसायनांपासून बनलेले असतात जे त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप विषारी असतात. या हानिकारक पदार्थांच्या संपर्कात आल्याने श्वसन प्रणाली आणि अंतर्गत अवयवांवर घातक परिणाम होऊ शकतात. म्हणूनच प्रत्येक होळी-रंगपंचमीला रायासानिक रंगांचा वापर न करण्याचे आवाहन केले जाते.

हेही वाचा :  Holi 2022: होळी खेळताना स्मार्टफोन सोबत घेऊन जाता येत नाही? 'या' टिप्सचा वापर करून फोन ठेवा सुरक्षित | Use this Tips to protect your gadgets from holi colors and water

(वाचा :- Mental Health Tips : स्ट्रेसमध्ये असाल तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ, नाहीतर मेंदूची होईल भयंकर अवस्था..!)​

डोळ्यांना इजा पोहोचवतात होळीचे रासायनिक रंग

डोळ्यांना इजा पोहोचवतात होळीचे रासायनिक रंग

डॉक्टरांनी सांगितले की होळीच्या रंगांमध्ये शिसे असते. जर ते चुकून डोळ्यात शिरले तर रॉड फोटोरिसेप्टर्सची कार्यक्षमता कमी होणे, अंधुक दृष्टी, डोळ्यांमध्ये जळजळ, मोतीबिंदू आणि ऑप्टिक न्यूरिटिसचा धोका वाढू शकतो. या धोकादायक रसायनामुळे डोळ्याच्या बाहुलीला इजा होऊ शकते, ज्यामुळे अंधत्वाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच मंडळी होळी खेळ पण जपून आणि रासायनिक रंगांचा वापर तर अजिबातच करू नका.

(वाचा :- Sushmita Sen Attack: हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,नसा ब्लॉक होण्यापासून वाचवतो हा पदार्थ)​

श्वसनाशी निगडीत समस्या

श्वसनाशी निगडीत समस्या

होळीच्या रंगांमध्ये क्रोमियमचा वापर केला जातो, ज्यामुळे श्वसनाचा त्रासही होऊ शकतो. हा रंग चुकून तोंडात गेल्यास दमा, ब्राँकायटिस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. जा तुम्ही यंदा रंगपंचमी खेळणार असाल तर कृपया ज्यांच्यासोबत ती खेळणार आहात त्यांना रासायनिक रंगांचा वापर न करण्यचे आवाहन करा. नैसर्गिक रंगांचा अधिकाधिक वापर करून सुरक्षित राहा.
(वाचा :- सायंटिस्टचा दावा – दारू सोडवणारं औषध अखेर सापडलं, दारूकडे ढुंकूनही बघत नाही व्यसनी, हे 5 अवयव करते कॅन्सरमुक्त)​

हेही वाचा :  Weight loss Mistake : वेटलॉस करत असाल तर सावधान, 141 किलो वेटलॉस करणं पडलं महागात, एक-एक करून सर्व अवयव झाले निकामी!

किडनी लिव्हरवर पडू शकतो प्रभाव

किडनी लिव्हरवर पडू शकतो प्रभाव

होळीच्या रंगांमध्ये पारा असतो, जो किडनी आणि यकृत यांसारख्या तुमच्या अंतर्गत अवयवांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. याशिवाय त्यामध्ये असलेले सिलिका त्वचा कोरडी करू शकते. अनेक जणरंग लावताना ते तोंडाजवळ लावतात वा अवघे तोंड रंगानी भरतात. पण यामुळे तोंडात रंग जाऊ शकतो आणि अंतर्गत अवयवांचा निरोगीपण धोक्यात येतो.
(वाचा :- Holi 2023 : बापरे, समोशात ठासून भरलेली ही एक भाजी देते कॅन्सरच्या पेशींना जन्म, या लोकांनी टेस्ट करणंही विषारी)​

स्किन इन्फेक्शन

स्किन इन्फेक्शन

होळीच्या रासायनिक रंगांमध्ये जड धातू, तुटलेल्या काचेचे तुकडे, रसायने आणि कीटकनाशके असतात. होळीच्या ह्या रंगांसोबत खेळल्यानंतर बॅक्टेरियामुळे होणारे त्वचेचे संक्रमण, त्वचेची ऍलर्जी, पुरळ उठणे, खाज सुटणे, जळजळ होणे आणि अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी या तक्रारी अनेकांना आढळतात.

(वाचा :- Milk in Weight Loss : दूध पिणा-यांचे वजन व चरबी कधीच होत नाही कमी? हेल्थ कोचने केला यामागील सायंटिफिक खुलासा)​

अशी घ्या काळजी

अशी घ्या काळजी
  1. होळीच्या दिवशी फक्त सेंद्रिय अर्थता नैसर्गिक रंग वापरा, त्वचेला मॉइश्चरायझ करा किंवा तेल लावा.
  2. डोळ्यांसाठी चांगले सनस्क्रीन, सनग्लासेस वापरा आणि कॉन्टॅक्ट लेन्स घालणे टाळा.
  3. डोळ्यांना स्पर्श करणे किंवा चोळणे टाळा कारण यामुळे जळजळ किंवा डोळ्यांच्या इतर समस्या उद्भवू शकतात.
  4. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, डोळे चोळू नका आणि फुगे वापरणे टाळा.
  5. रंगांशी खेळल्यानंतर, रंग काढण्यासाठी डिटर्जंट, स्पिरिट, नेल पॉलिश रिमूव्हर, अल्कोहोल किंवा एसीटोन वापरू नका.
  6. डॉक्टरांनी सुचवलेला साबण वापरा, स्क्रब करू नका आणि फक्त त्वचेला मॉइश्चरायझ करा.
हेही वाचा :  Holi 2022 : होळीच्या रंगांमुळे त्वचेला होतोय त्रास? आजच वापरून पाहा 'हे' सोपे घरगुती उपाय | Does Holi colors cause skin problems? Try these simple home remedies today

(वाचा :- Papaya Water : कॅन्सरच्या पेशी मुळापासून सुकवून टाकतं पपईचं पाणी, पोटातून खेचून घेतं सर्व घाण, या पद्धतीने खा)​
टीप :- हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …