रंगाने त्वचेला हानी पोहण्याची भीती? होळीच्या आधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

रंगांचा सण होळी, कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत अतिशय उत्साहात साजरा केला जातो. स्वादिष्ट मिठाई, आकर्षक रंग आणि पाण्याची फुग्यांची मौजमजा अशी रेलचेल घेऊन होळी लवकरच येतेय.

सणाची मौजमजा करून झाली की नंतर मात्र चेहरा आणि केसांवरून रासायनिक रंगांचे डाग काढण्याचे महाकठीण वेदनादायक काम करावे लागते. रसायने आणि सूर्याचे कडक ऊन यामुळे त्वचा कोरडी पडू शकते, खाज येते. कित्येकदा होळी संपून गेल्यानंतर अनेक आठवडे हा त्रास होत राहतो. होळी खेळायला आवडते पण केस, नखे, त्वचा यावर होणाऱ्या परिणामांची चिंता वाटत असेल तर हे काही साधे नियम पाळा आणि अगदी निश्चिंत होऊन होळीचा आनंद लुटा. यासाठी आम्ही डॉ. तृप्ती डी. अग्रवाल, कन्सल्टंन्ट डर्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट आणि एस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून माहिती घेतली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

​होळीच्या आधी त्वचेसाठी हे उपाय अवश्य करा​

​होळीच्या आधी त्वचेसाठी हे उपाय अवश्य करा​
  • रंगांमधील कठोर रसायनांपासून त्वचेचा बचाव व्हावा यासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे
  • होळी खेळायला सुरुवात करण्याच्या किमान १० ते १५ मिनिटे आधी सनस्क्रीन आणि नारळाचे किंवा राईचे तेल लावा. चेहऱ्याला तेल व सनस्क्रीन लावताना, कान, मान व शरीराचा जो भाग उघडा राहणार आहे त्यावर देखील तेल व सनस्क्रीन लावायला विसरू नका
हेही वाचा :  'जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,' अजित पवारांच्या ट्विटवर निलेश राणे म्हणाले "नुसत्या सूचना देऊ नका, तुमच्या गटात..."

​कोरड्या त्वचेसाठी​

​कोरड्या त्वचेसाठी​

​तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्हाला रसायनांपासून जास्त धोका आहे. त्वचा रोजच्या रोज मॉइश्चराइज करणे, सनस्क्रीन वापरणे अत्यावश्यक आहे. होळीच्या किमान एक आठवडा आधी ब्लीच किंवा केमिकल पील्स वापरणे टाळा
(वाचा – सतत चेहरा धुतल्याने या समस्यांना जावे लागेल सामोरे, चेहरा होऊ शकतो खराब)

​सुती कपडे वापरताना लक्षात ठेवा​

​सुती कपडे वापरताना लक्षात ठेवा​

आरामदायी असावे म्हणून जर सुती कपडे वापरणार असाल तर लक्षात ठेवा की सुती कपड्यांमधून रंग तुमच्या त्वचेपर्यंत झिरपू शकतो. जरा जाडसर कपडा वापरा, पूर्ण बाह्या असलेले कपडे वापरा जेणेकरून शरीराचा कोणताही भाग उघडा राहून त्यावर रंगांचे हानिकारक परिणाम होणार नाहीत

(वाचा – सकाळच्या काळ्या चहाने केस धुतले तर मिळेल अशी चमक की व्हाल आश्चर्यचकीत)

​नखांमध्ये रंग न जाण्यासाठी​

​नखांमध्ये रंग न जाण्यासाठी​

रंग नखांमध्ये जाऊ नये यासाठी नखे ट्रिम करा, त्यावर ग्लॉसी नेलपेंट किंवा क्लीयर कोटेड नेल लॅकर लावा. नखांच्या भोवती त्वचेवर देखील पॉलिश लावा म्हणजे तिथे रंगांचे डाग राहणार नाहीत. नखांवर आणि त्यांच्या भोवती साधी पेट्रोलियम जेली (जसे की, व्हॅसलिन) लावू शकता. कृत्रिम आणि मॅन्युफॅक्चर्ड रंगांऐवजी नैसर्गिक व ऑरगॅनिक रंग वापरा.

हेही वाचा :  त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं

(वाचा – ५० व्या वर्षीही मिळेल करिष्मा कपूरसारखी त्वचा, तांदळाचे पाणी करेल चेहऱ्यावर जादू, सुरकुत्या होतील गायब)

​होळीनंतर त्वचेची अशी घ्या काळजी​

​होळीनंतर त्वचेची अशी घ्या काळजी​
  • होळी खेळून झाल्यानंतर चेहरा व शरीरावरुन रंग अगदी सावकाश काढा. त्यासाठी सौम्य साबण किंवा सोप फ्री क्लीनरचा वापर करा त्वचा खूप जास्त घासली तर त्यावर खाज येऊ शकते,चट्टे उठू शकतात. रंग सहजपणे निघत नसल्यास ऑइल-बेस्ड सोल्युशन्स वापरा
  • आंघोळ करून झाल्यानंतर मॉइश्चरायजर व सनक्रीन लावा. होळीच्या नंतर किमान एक आठवडा तरी केमिकल पील, हेअर रिडक्शन, रसायनांचा वापर करणे टाळा
  • तुम्ही काही औषधे घेत असाल तर ती नेहमीप्रमाणे सुरु ठेवाज्या मुलांना एक्झिमा आहे तसेच ज्यांना ऍक्ने व सोरायसिस यासारखे त्वचेचे त्रास आहेत त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सुकी होळी, रंगांचा व गुलालाचा कमीत कमी वापर हे त्यांच्यासाठी योग्य ठरेल.

काही समस्या उद्भवल्यास किंवा आधीपासून असलेले आजार गंभीर झाल्यास किंवा नवा आजार सुरु झाल्यास, जवळच्या डर्मेटोलॉजिस्टकडे जा किंवा ज्याठिकाणी मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोन व पूर्णकालीन डेडिकेटेड डॉक्टर्स आहेत अशा कोणत्याही केअर हॉस्पिटलमध्ये जा.

हेही वाचा :  होळीचे रंग आणि Chronic Obstructive Pulmonary Disease

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …