त्वचेशी संबंधित ‘या’ समस्यांचे कारण कोरोना असू शकतो, वाचा डॉक्टरांचे मत

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. चीनमधील कोरोना स्फोटातून संपूर्ण जग अद्याप सावरलेले नाही. संशोधनानुसार, कोरोना हा केवळ श्वसनाचा आजार नसून त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो. असे स्पष्ट मत आहे. कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांना आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे शरीरावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. कोरोना हा केवळ श्वासोच्छवासाचा आजार नाही तर शरीराच्या इतर भागांवरही त्याचा परिणाम होतो. पूर्वी असे मानले जात होते की कोरोनामुळे फक्त आपल्या फुफ्फुसांना संसर्ग होतो, परंतु आरोग्य तज्ञांच्या मते, किडनी आणि हृदयाव्यतिरिक्त, कोविड 19 त्वचेवर देखील परिणाम करतो. कोरोनाच्या या आधीच्या लाटेमध्ये देखील त्वचेवर परिणाम झालेला दिसून आला आहे. त्यामुळे यावेळी त्वचेची आणि आरोग्याची कळजी घेणं गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : istock)

​संशोधनात काय समोर आले?

ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी संशोधनामध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत यानुसार त्वचेवर पुरळ उठणे हे कोविडचे लक्षण असू शकते. हे जर्नल कोविड महामारीच्या सुरुवातीच्या एक वर्षानंतर प्रकाशित झाले. संशोधनात, कोरोना आणि त्वचेच्या समस्यांमध्ये संबंध आढळून आला. या संशोधनात सुमारे 3 लाख लोक सामील होते, आकडेवारीनुसार, कोविड 19 दरम्यान, सुमारे 9 टक्के लोकांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागला आणि 6.8 टक्के लोकांना पुरळ उठले. त्यामुळे त्वचेवर लाल डाग आल्यास किंवा पुरळ आल्यास डॉक्टरांना लगेच भेट द्या.

हेही वाचा :  लाखो करोडोत खेळणा-या कंगनाने का नेसली 600 रू साडी? या एका वाक्याने केलं लोकांच्या काळजात घर

​त्वचेवर दिसतात ही लक्षणे

कोरोना विषाणूमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, थकवा, डोकेदुखी, जुलाब, चव आणि सुगंध यांचाही परिणाम होतो. पण कोरोनामध्ये त्वचेशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. कोरोनामध्ये त्वचेवर पुरळ, एक्जिमा, पॅप्युलर रॅश, वेसिक्युलर रॅश, ओरल रॅश, पिटिरियासिस रोझिया किंवा व्हॅस्क्युलिटिक रॅश यांचा समावेश होतो. (वाचा :- मेथीच्या दाण्यांपासून मिळवा घनदाट आणि लांब केस, लोक सुद्धा विचारू लागतील तुमच्या सुंदर केसांचे रहस्य)

करोना काळात घ्या अशी काळजी

​त्वचेशी संबंधित समस्या कशा ओळखाव्यात

कोविड संसर्गामध्ये त्वचेशी संबंधित समस्या सामान्य असू शकतात. पण ही त्वचा संबंधित समस्या कोरोनाशी संबंधित आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे लागेल. या स्थितीत, बोटे फुगतात आणि गुलाबी, लाल किंवा जांभळ्या रंगाची होतात. दुसरीकडे, ओठांवर तोंडी पुरळ उठते आणि काहीवेळा ते तोंडाच्या अल्सरच्या रूपात देखील होते. (वाचा :- Hair Care Tips : केसातील कोंड्याने हैराण झाले आहात? मग तज्ञांनी सांगितलेले हे आयुर्वेदिक उपाय करुन पाहाच )

​अशी घ्या त्वचेची काळजी

बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्याच प्रमाणे तणाव, जास्त घाम येणे, तणाव यामुळे त्वचेच्या समस्याही वाढतात.क्लींजिंग करणे फायदेशिर ठरते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सौम्य क्लींझर किंवा दुधाचा वापर करु शकता. त्याच प्रमाणे व्हिटॅमिन सी सीरम आणि अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी वापरले पाहिजेत. (या लेखात दिलेली माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. महाराष्ट्र टाइम्स याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच उपचार करा.)

हेही वाचा :  रात्रीची नखे कापणे का मानले जाते अशुभ? यामागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

RBIची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही

Reserve Bank Of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बॅकेवर मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ठाणे …

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर …