बापरे, समोशात ठासून भरलेली ही एक भाजी देते कॅन्सर पेशींना जन्म, या लोकांनी टेस्ट करणंही विषारी

Samosa Side Effects on Holi : वडापावच्या गाडीवर आपण गेलो आणि वडापाव थंड असेल तर लागलीच अपोन समोसा द्या असं म्हणतो. वडापावनंतरची सगळ्यांची सर्वात आवडती दुसरी पसंत असणारा हा पदार्थ महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच पण अवघ्या जगभरात सुद्धा याचे चाहते कोटींच्या संख्येने आहेत. एक परफेक्ट नाश्ता म्हणून सुद्धा समोसाकडे पाहिले जाते. त्यातील स्टफिंग आणि कुरकुरीतपणा अक्षरश: वेड लावतो आणि सोबत गोड तिखट चटणी असेल तर ते स्वर्ग सुखच म्हणायचं. तर असा हा समोसा हेल्दी आहे का तर अजिबात नाही.

कारण समोसा मसालेदार असतो आणि तळला जातो. त्यामुळे तुम्ही मर्यादित प्रमाणातच याचे सेवन केले पाहिजे. त्यातच होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बरेच लोक या दिवशी रंगात न्हाऊन आल्यावर चमचमीत किंवा तेलकट तुपकट पदार्थ खातात आणि त्यात समोश्यांचे नाव मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. पण समोसा खाण्याचे काही तोटे आहेत आणि तेच आम्ही आज तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. काही खास लोकांसाठी तर समोसा अधिकच नुकसानदायक आहे आणि अशा लोकांनी समोसा पासून लांब राहिलेलंच उत्तम! (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  काचेचा रंग फाडतो डोळ्यांतलं नाजुक बुबुळ, डॉ सांगितले 5 भयंकर नुकसान व बचावासाठी उपाय

ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त आहे

ज्यांचे कोलेस्टेरॉल जास्त आहे

समोसा हा तेलात तळलेला पदार्थ असल्याने त्यामध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फॅट कोलेस्टेरॉल वाढते आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम हा आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे ज्या लोकांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त आहे त्यांनी समोसे खाउच नयेत. पण त्यशिवाय सर्वच तळलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. जर तुम्हाला सुद्धा कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्कीच गांभीर्याने घ्यायला हवी.

(वाचा :- Milk in Weight Loss : दूध पिणा-यांचे वजन व चरबी कधीच होत नाही कमी? हेल्थ कोचने केला यामागील सायंटिफिक खुलासा)​

हाय ब्लड शुगरचे रुग्ण

हाय ब्लड शुगरचे रुग्ण

जास्त साखर असलेल्या रुग्णांनीही समोसे खाऊ नयेत. कारण, पबमेड सेंट्रलवर (PubMed Central) प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जे तळलेले अन्न सेवन करतात त्यांना टाइप-2 मधुमेह असू शकतो. समोसा सारखे पदार्थ रक्तातील साखर वेगाने वाढवतात आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतात. जर तुम्हाला हाय ब्लड शूर असेलतर सामोसे अगदी लिमिट मध्येच खा आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा.
(वाचा :- छातीत जडपणा, धाप लागणं, ऑक्सिजनची कमतरता जाणवते? फुफ्फुसातील घाण काढून श्वास स्वच्छ करतात हे 5 आयुर्वेदिक उपाय)​

हेही वाचा :  होळीचे रंग आणि Chronic Obstructive Pulmonary Disease

हृदयविकाराचे रुग्ण

हृदयविकाराचे रुग्ण

जर तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले नसेल आणि तुम्ही हृदयविकाराचे रुग्ण असाल तर चुकूनही समोसे खाऊ नका. कारण, याचा मज्जातंतूंवर खूप वाईट परिणाम होतो, ज्यामुळे हृदयावर दाब वाढू लागतो. या स्थितीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा अनेक प्रकरणात जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्हाला देखील हृदयाचा कोणताही त्रास असेल तर अजिबात धोका पत्करू नका आणि आपल्या आहारावर लक्ष द्या.
(वाचा :- Papaya Water : कॅन्सरच्या पेशी मुळापासून सुकवून टाकतं पपईचं पाणी, पोटातून खेचून घेतं सर्व घाण, या पद्धतीने खा)​

हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण

हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण

उच्च रक्तदाबामुळे हृदय, मेंदू आणि किडनीला इजा होण्याचा धोका असतो. NCBI वर प्रकाशित संशोधनात म्हटले आहे की, समोसा सारखे जास्त तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब निर्माण होतो. त्यामुळे जर तुम्हाला वा तुमच्या ओळखीत कोणालाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांना मार्गदर्शन करा आणि हेल्दी जीवनशैलीचे महत्त्व पटवून द्या.
(वाचा :- Weight Loss Rainbow Diet : झपाट्याने वितळेल पोट व कंबरेची चरबी, कॅन्सरचा धोका कायमचा टळेल, सुरू करा रेनबो डाएट)​

सामोसामधील बटाटा ठरतो कॅन्सरला कारण

सामोसामधील बटाटा ठरतो कॅन्सरला कारण

बटाट्यामध्ये ऍक्रिलामाइड नावाचे एक संयुग असते, जे बटाटा जास्त तळला गेला तर खूप विषारी बनते. NCBI वर उपलब्ध संशोधनानुसार, या संयुगामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळेच मंडळी तुम्ही समोसा पासून दूर राहिलेलेच बरे. कोणताही पदार्थ हा मर्यादित खाल्यास त्याचा आनंद नक्की घेता येतो. पण जेव्हा तुम्ही त्याचा अतिरेक करता तेव्हा मात्र त्याचे वाईट परिणाम व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणूनच आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि हेल्दी राहा.

हेही वाचा :  "तो रडत होता आणि मला झोपायचं होतं," आईने बाळाच्या दुधात मिसळलं 10 लोकांना ठार करेल इतकं ड्रग अन् नंतर..

(वाचा :- Diabetes Yoga : या उपायात ठासून भरलंय डायबिटीजचा मुळापासून नाश करणारं इन्सुलिन, कधीच वाढणार नाही रक्तातील साखर)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …