“तो रडत होता आणि मला झोपायचं होतं,” आईने बाळाच्या दुधात मिसळलं 10 लोकांना ठार करेल इतकं ड्रग अन् नंतर..

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैलाहन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण नंतर धक्कादायक खुलासे समोर आले. 

मुलाच्या दुधात होतं 10 लोकांना ठार करेल इतकं फेंटेनाइल

बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता, त्याच्या शरिरात 10 लोकांना ठार करु शकतं इतकं फेटेंनाइल होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली. मंगळवारी चौकशी करण्यात आली असता, बाळाच्या आईने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले. ज्या दिवशी बाळाचा मृत्यू झाला, त्या दिवशी मी फार थकले होते. मला झोपायचं होतं, आणि बाळ सतत रडत होतं. यामुळे मी बाळाला झोपवण्यासाठी दुधात फेटेनाइल मिसळलं अशी माहिती तिने दिली. 

हेही वाचा :  प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रेशर कुकर उचलला अन्...; दरवाजा उघडल्यानंतर शेजाऱ्यांसह पोलीसही चक्रावले

“मला वाटलं हे फक्त कोकेन आहे, आणि बाळ झोपी जाईल”

बाळाच्या आईने तिने एका बाटलीत दुधासह फेटेंनाइल मिसळलं होतं. पण आपल्याला ते कोकेन आहे असं वाटलं असा तिचा दावा आहे. मला वाटलं होतं बाळ त्याच्याने झोपी जाईल असं तिचं म्हणणं आहे. पोलीस तिने दिलेल्या माहितीची पडताळणी करत आहेत. 

“कोणती आई असं कृत्य करेल? ती नक्की आजारी आहे”

या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “असं कोण करतं? कोणती आई असं कृत्य करेल? ही सामन्य बाब नाही. ही महिला आजारी आहे. एक आई आपल्या बाळासह असं कृत्य कसं काय करु शकते हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या धोकादायक ड्रगमुळे कोणाचाही जीव जाता कामा नये. खासकरुन लहान मुलांचा”.

आरोपी आईची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. दरम्यान तिच्यावर हत्या आणि बंदी घालण्यात आलेलं ड्रग ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसंच फ्लोरिडमध्ये अन्य पालकांकडेही हे ड्रग आहे का याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा :  मित्राला आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले, 63 दिवस वाट पाहिल्यानंतर कापला प्रायव्हेट पार्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …