१०० कोटीचा आलिशान बंगला, शिल्पा शेट्टीच्या घराचे इंटिरिअर पाहाल तर म्हणाल हा तर राजवाडाच

‘दिलवालों के दिल का करार लुटने’ म्हणत शिल्पा शेट्टीने अनेकांच्या मनात घर केलं आहे. आपला फिटनेस आणि सौंदर्याची जादू शिल्पाने अनेकांच्या मनावर चालवली. केवळ अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही शिल्पाने ओळख निर्माण केली. फिटनेस व्हिडिओ असो वा फूड व्हिडिओ असो शिल्पाचा चाहतावर्ग यामुळे अधिक वाढला. अशी ही सर्वांची लाडकी शिल्पा एखाद्या राजकुमारीला शोभेल अशाच घरात राहाते. घर नव्हे तर राजवाडा असंच तिच्या घराचे इंटिरिअर पाहून म्हणावे लागेल.

शिल्पा शेट्टी कुंद्राच्या बंगल्याची किंमत ही साधारण १०० कोटीच्या आसपास अथवा त्यापेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात येते. तर शिल्पा आणि तिचा नवरा राज कुंद्रा आपल्या कुटुंबासह मुंबईतील या बंगल्यात वास्तव्यास आहेत. एक नजर टाकूया शिल्पाच्या या आलिशान बंगल्यावर (फोटो सौजन्य – @theshilpashetty Instagram)

​फळाफुलांनी सजलेले मोठे गार्डन​

​फळाफुलांनी सजलेले मोठे गार्डन​

शिल्पाच्या बंगल्याच्या बाहेर अनेक फळं, भाजी आणि फुलांनी असे भरलेले आणि सजलेले गार्डन आहे. घरातच भाजी पिकवून ऑर्गेनिक भाजी खाण्यावर शिल्पा भर देते. अनेकदा ती वाढलेल्या फळांचा आणि भाज्यांचा व्हिडिओदेखील शेअर करत असते. याशिवाय याच गार्डनमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शिल्पा योगा करताना दिसून येते.

हेही वाचा :  बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी साडीमध्ये तापवलं इंटरनेटचे तापमान

​देवघराचे उत्तम इंटिरिअर​

​देवघराचे उत्तम इंटिरिअर​

शिल्पा गणपती असो वा नवरात्र असो कोणताही सण हा मनोभावे साजरा करते. त्यानुसारच तिने सर्व देवीदेवतांच्या मूर्ती आणि फोटोंसह देवघराचे इंटिरिअर करून घेतले आहे. देवीभक्त असल्यामुळे देवघराचे इंटिरिअर करताना कमळाच्या फुलांचे छाप दरवाजावर कोरण्यात आले आहेत. तर फुलांची आरास मांडता येईल इतकी मोठी जागाही ठेवण्यात आली आहे.

(वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद ओकचे घर आहे आशियाना, इंटिरिअरने डोळे दिपतील)

​लांबलचक लॉन​

​लांबलचक लॉन​

घरात जाताना लांबलचक लॉन असून दरवाजांवर फुलांच्या वेलीही सोडण्यात आल्या आहेत. घराचा लुक अधिक क्लासी दिसण्यासाठी याचा होम डेकोरमध्ये उपयोग करता येऊ शकतो. याशिवाय व्हाईट फ्लोअर लुक आणि घरात जाताना कमानीचे इंटिरिअरही करण्यात आले आहे.

(वाचा – Living Room सजवण्याच्या सोप्या ७ पद्धती, लहान जागाही भासेल मोठी)

​घरातच व्यायामासाठी जिम​

​घरातच व्यायामासाठी जिम​

शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असून घरातच व्यायामासाठी जिम तयार करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यक असणारी सर्व उपकरणेही ठेवण्यात आली आहेत. शिल्पा आपले फिटनेसचे अनेक व्हिडिओ याच जिममध्ये चित्रीत करत असल्याचेही दिसून येते.

(वाचा -‘स्ट्रगलर साला’ ते स्वतःच्या घराचा प्रवास, कुशल बद्रिकेच्या घराची मराठमोळी सुबक मांडणी)

हेही वाचा :  बापरे, मेंदू ते हाडे सर्वांचा भुगा करते सेरोटोनिनची कमी, पोट साफ होण्यासाठी खा हे 5 पदार्थ

​उत्तम शिल्पकलेचे जोपासणारे अँटिक पीस​

​उत्तम शिल्पकलेचे जोपासणारे अँटिक पीस​

अनेकदा मोठमोठ्या कलाकारांकडे अँटिक पीस दिसून येतात. शिल्पाच्या घरातदेखील ठिकठिकाणी असे अँटिक पीस दिसून येतात. शिल्पाला कलेची उत्तम जाण आहे. तुम्हीही तुमच्या घराच्या आकारानुसार वेगवेगळे अँटीक पीस आवड असल्यास घराची सजावट करताना वापरू शकता.

​भिंतीवरील पेंटिंग्ज​

​भिंतीवरील पेंटिंग्ज​

घराच्या भिंतीला देण्यात आलेल्या रंगसंगतीनुसार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पेंटिंग्ज अथवा फोटो फ्रेम्स भिंतीवर लाऊ शकता. शिल्पाच्या घरात अनेक ठिकाणी अशा कुटुंबाच्या आणि अँटिक फोटोफ्रेम्सदेखील दिसून येतात. शिल्पाने बंगल्यातील अनेक रूम्समध्ये या सजावटीचा वापर केला आहे.

​सोफासेटची उत्तम रंगसंगती​

​सोफासेटची उत्तम रंगसंगती​

लिव्हिंग रूममध्ये भिंतींना कोणता रंग आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या घरातील सोफासेटची रंगसंगती जपावी. शिल्पाचे घर मोठे असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे सोफा सेट दिसून येतात. लाल रंगापासून ते ग्रे रंगापर्यंत वेगवेगळे सोफा सेट तुम्ही वापरू शकता.

​लिव्हिंग रूमची मांडणी​

​लिव्हिंग रूमची मांडणी​

लिव्हिंग रूम मोठी असल्यास सोफा सेट, वेगवेगळे अँटीक पीस आणि रंगसंगती जोडून तुम्ही सजावट करू शकता. शिल्पाच्या बंगल्यात अशी विविध ठिकाणी सुबक आणि सुंदर मांडणी तुम्हाला दिसेल. ज्यावरून तुम्ही प्रेरणा घेऊन आपले घर सजवू शकता.

हेही वाचा :  Shane Warne Passes Away : शेन वॉर्नच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये हळहळ

शिल्पा शेट्टीच्या घराची सफर आम्ही तुम्हाला घडवली आहे. तिच्याइतके घर आपल्याला सजवणे शक्य नसले तरीही त्यावरून आयडिया घेऊन नक्कीच घराची सजावट करता येईल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …