Kama Sutra : जगाला ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ देणारे वात्स्यायन आयुष्यभर का राहिले अविवाहीत?Kama Sutra : जगाला ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ देणारे वात्स्यायन आयुष्यभर का राहिले अविवाहीत?

Kama Sutra of Vatsyayana : सजीवांमध्ये लैंगिक संबध हे प्रजननासाठी अत्यंत महत्वाचे असतात. मात्र, मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याच्यासाठी लैंगिक संबध हे फक्त प्रजननापुरते मार्यादित नाहीत. वैयक्तीक सुख आणि समाधान देखील विचारात घेतले जाते. आजही लैंगिक संबध ही अत्यंत खाजगी बाब समजली जाते. त्यामुळे यावर उघडपणे भाष्य अथवा चर्चा केली जात नाही.  मात्र, महर्षी वात्स्यायन (Maharshi Mallanaga Vatsyayana) यांनी गुप्त साम्राज्याच्या काळात इ.स. चौथ्या ते सहाव्या शतकांदरम्यान जगाला ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ (Book Kamasutram  दिला. त्यांच्या या ग्रथानंतर जगात खळबळ उडाली. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी लैंगिक विषयावर खुलेपणाने चर्चा करायला भाग पाडले.  ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ देणारे वात्स्यायन अविवाहीत होते. शेवटपर्यंत ते अविवाहीत का राहिले हे देखील एक रहस्यच आहे. 

इ.स. चौथ्या ते सहाव्या शतकांमध्ये वात्स्यायन यांनी लिहीलेला  ‘कामसूत्र’ हा ग्रंथ आजही चर्चेचा विषय आहे. लैंगिक संबध आणि त्याचे महत्व विषद करण्यासाठी वात्स्यायन यांनी हा ग्रंथ लिहिला. दोन हजार वर्षानंतर आजही वात्स्यायन यांचा ‘कामसूत्र’ हा ग्रंथ वाचला जातो. जगभरात विविध भाषांमध्ये या ग्रंथाच्या अनुवादीत प्रती छापल्या आणि वाचल्या जात आहेत. 

हेही वाचा :  "तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

कोण आहेत महर्षी वात्स्यायन

गुप्त साम्राज्याच्या काळात महर्षी वात्स्यायन यांनी  ‘कामसूत्र’ हा ग्रंथ लिहीला. वात्स्यायन हे वाराणसी म्हणजे काशीमध्ये (Kashi) बराच काळ वास्तव्याला होते.  वात्स्यायन  हे अत्यंत ज्ञानी ऋषी मानले जातात, त्यांना वेदांचेही चांगली जाण होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात ते पाटण्यात राहत होते, असा दावाही इतिहासतज्ञ करतात. 

महर्षी वात्स्यायन यांनी  ‘कामसूत्र’ हा ग्रंथ का लिहीला?

लैंगिक विषयावर खुलेपणाने चर्चा व्हावी या उद्देशाने महर्षी वात्स्यायन यांनी  ‘कामसूत्र’ हा ग्रंथ लिहीला. त्यांना लैंगिकते संदर्भात सखोल ज्ञान होतं. ‘कामसूत्र’ या ग्रंथात त्यांनी लैंगिक संबधाचे नेमकं महत्व काय? आकर्षण, उत्कंटा आणि त्यातुन मिळणाने मानसिक सुख यावर भाष्य केले. लैंगिक संबधाचे नातेसंबधावर होणारे परिणाम, स्त्री आणि पुरुष यांच्यातील भावना तसेच लैंगिक संबधातून त्यांना मिळणारा अनुभव यावर मत मांडले आहे. यामुळे लैंगिक विषयावर चर्चा करताना पुरुषांसह स्त्रियांचे मतही विचारात घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा :  "सर्वात आधी राज्यपालांना..."; अर्वाच भाषेत शिवीगाळ करणाऱ्या संजय गायकवडांना राऊतांनी सुनावले

‘कामसूत्र’ एक कला

 ‘कामसूत्र’ एक कला असल्याचे महर्षी वात्स्यायन मानतात. त्यानी हा ग्रंथ वेश्यालयात दिसणाऱ्या मुद्रा शहरातील वधू आणि वेश्यांशी बोलल्यानंतर लिहिला असल्याचे इतिहासतज्ञ सांगतात.कामसूत्राच्या मूळ पुस्तकाकडे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून पाहिले पाहिजे.

महर्षी वात्स्यायन आयुष्यभर का राहिले अविवाहीत?

महर्षी वात्स्यायन यांनी जगाला ‘कामसूत्र’सारखा ग्रंथ दिला. मात्र, ते  सेक्समध्ये गुंतले नाहीत. वात्स्यायन हे आजीवन ब्रह्मचारी होते. आजीवन ब्रह्मचारी असूनही त्यांनी असे पुस्तक कसे लिहिले लैंगिक संबधातील अनेक पैलू त्यांनी या पुस्तकात अगदी बारकाईने कशा मांडल्या याबाबत आश्चर्य  व्यक्त केले जाते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …