“कोणी फोन केला तर रिकॉर्ड करा आम्ही त्याचा…”; केजरीवालांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Delhi Civil Polls : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकहाती सत्ता मिळवलीय. भाजपची (BJP) 15 वर्षांची सत्ता आपने आपल्याकडे घेतली आहे. आपने 250 पैकी 134 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी त्यांच्या नगरसेवकांसोबत संवाद साधला आहे. ही निवडणूक आपल्यासाठी खूप कठीण होते. आपल्या विरोधात षडयंत्र रचले गेले, सर्व प्रकारच्या यंत्रणा कामाला लावल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणुकांपैकी ही निवडणूक सर्वात कठिण होती, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

माध्यमांवर दबाव टाकून 24 तास आमच्याविरोधात प्रचार

“दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी 7 मुख्यमंत्री 17 केंद्रीय मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोर लावला होता. माध्यमांवर दबाव टाकून 24 तास आमच्याविरोधात प्रचार केला गेला. रोज सकाळी 9 वाजता खोटा व्हिडीओ समोर आणला जायचा आणि तो दिवसवभर चॅनलवर चालवला जायचा,” असे केजरीवाल म्हणाले.

कोणाचा फोन आला तो रेकॉर्ड करा

“यांचा खोटारडेपणा समोर आणणे गरजेचे आहे. म्हणून जर कोणाचा फोन आला तो रेकॉर्ड करा. जर कोणी भेटायला आले तर त्याला आवाज रेकॉर्ड करा. तेलंगणाच्या रेकॉर्डिंगमध्ये दिल्लीतून 40 आमदार विकत घेतल्याचे लोक सांगत होते. जो कोणी तुमच्याकडे येईल, त्यांची रेकॉर्डिंग करा, आम्ही रेकॉर्ड करून त्यांचा पर्दाफाश करू. कोणाचा फोन आला किंवा कोणी भेटायला आले तर लगेच आपल्या समन्वयकाला कळवा. तुमच्या आमदाराला सांगा किंवा वर सांगा म्हणजे लगेच कारवाई करू,” असेही केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा :  Narayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!

एकमेकांमध्येच लढलात तर दोघांचेही नुकसान 

“नगरसेवक आणि आमदार दोघांनी मिळून एकत्र काम केले तर ते 10 पटीने वाढेल. सकारात्मकता वाढली तर आमदाराचे नाव सर्व्हेमध्ये आपोआप येईल आणि तुम्ही एकमेकांमध्येच लढलात तर दोघांचेही नुकसान होईल,” असेही केजरीवाल म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्ट आता यापुढे व्हॉट्सअपवर केससंबंधी मेसेज पाठवणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही …

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …