इंटिरिअरच्या साम्राज्यात का ठरते गौरी खान ‘क्वीन’, होम डेकोरसाठी मिळेल रॉयल लुकची प्रेरणा

Gauri Khan Home Decor: गौरी खान ही केवळ शाहरूखची पत्नी म्हणूनच प्रसिद्ध नाही तर तिने होम डेकोर क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळवली आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपले घर हे गौरी खानकडून सजवून घेतले आहे. तर वेगवेगळ्या घरांचे, रेस्टॉरंट आणि इंटरनॅशनल प्रोजेक्टही गौरी खानने पूर्ण केले आहेत. युनिक, स्टायलिश आणि रॉयल असा लुक घराला द्यायचा असेल तर तुम्ही गौरी खानच्या इंटिरिअरवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. तुम्हालाही तुमच्या घरासाठी सजावट सुचत नसेल तर खास गौरी खानचे इंटिरिअर आम्ही घेऊन आलो आहोत. यावरून प्रेरणा घेत तुम्ही तुमच्या बजेटनुसार नक्कीच घराला रॉयल लुक देऊ शकता. (फोटो सौजन्य – @gaurikhan Instagram)

​झुंबरासह क्लासी एन्ट्रन्स​

​झुंबरासह क्लासी एन्ट्रन्स​

घराचा दरवाजा कसा असावा अथवा घराच्या बाहेरची जागा कशी वापरण्यात यावी हे घर घेतल्यानंतर प्रत्येकाचं डोक्यात फिक्स असतं. पण तुम्हाला त्यात रॉयलनेस हवा असेल तर तुम्ही गौरी खानच्या या इंटिरिअरवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. लाईट्स आणि फ्लोअरिंगवरच हा लुक आकर्षक दिसून येतोय. तुमच्याकडे जागा कमी असली तरीही तुम्ही असा लुक निर्माण करू शकता. घराबाहेर लहान झुंबराचा वापरही करता येतो.

हेही वाचा :  नागपुरातील रामबागेत 'रावणराज' अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?

​क्लासी लिव्हिंग रूम​

​क्लासी लिव्हिंग रूम​

लिव्हिंग रूममध्ये अधिक पसारा न मांडता ऑफ व्हाईट रंगाच्या भिंती ठेवत त्यावर एक – दोन कॅनव्हास पेंटिंग आणि रंगाला साजेसा सोफा आणि खुर्ची तुम्ही मांडू शकता. त्यासमोर एखादे लाकडी टेबल आणि फुलांचा वास लिव्हिंग रूमची शोभा अधिक वाढवेल. याशिवाय कोपऱ्यात इनडोअर प्लांटची मांडणी करून लिव्हिंग रूमचा लुक तुम्ही पूर्ण करू शकता.

(वाचा – Kitchen Tips: चहाचे कळकट्ट भांडे बघूनच होतोय त्रास, या पद्धतीने स्वच्छ कराल तर होईल चकचकीत)

​रॉयल आणि Peaceful Bedroom​

-peaceful-bedroom

दिवसभर थकून आल्यानंतर सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे बेडरूम. शांतता हवी असणारी ही जागा गौरी खानने इतकी सुंदर डेकोर केली आहे की, ती पाहिल्यानंतरच मनाचा थकवा दूर होतो. तुम्हीही यावरून प्रेरणा घेत बेडचे डिझाईन करू शकता. कारपेट फ्लोअरिंग आणि त्यावर बेड हे उत्तम समीकरण आहे.

(वाचा – आलिशान घर आणि क्लासिक फर्निचर, अशी आहे श्रेया बुगडेच्या घराची सुबक मांडणी)

​गेस्ट रूम​

​गेस्ट रूम​

युनिक फर्निचर, साधारण एक सोफा अथवा खुर्ची कम सोफा आणि समोरच्या भिंतीवर पुस्तकांचे कपाट अथवा टी. व्ही. असे इंटिरिअर करून तुम्ही घरातील गेस्ट रूम सजवू शकता. गेस्ट रूम सजवताना तुम्ही एका भिंतीवर वेगवेगळ्या फ्रेममधील फोटोजदेखील सेट करू शकता.

हेही वाचा :  घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, उद्या शेवटचा दिवस; जाणून घ्या प्रोसेस

(वाचा -सुनील शेट्टीच्या लाडक्या आथिया आणि क्रिकेटर के एल राहुलचा लग्नसोहळा पार पडणारा ‘जहान’ बंगला आहे तरी कसा )

​डिसेंट डायनिंग​

​डिसेंट डायनिंग​

घरात एकत्र जेवायला बसणे हे आजही आपल्याकडे फॉलो केले जाते. त्यासाठी करण्यात येणारे डायनिंगही तितकेच सुंदर आणि कम्फर्टेबल असायला हवे. लिव्हिंग रूमच्या मागेच तुम्ही असे डायनिंगसाठी फर्निचर तयार करून घेऊ शकता. लिव्हिंग रूमच्या रंगाप्रमाणे याचा रंग मॅच करावा, ज्यामुळे दिसायला अत्यंत सुंदर दिसते.

​बाल्कनीचा करू शकता असा उपयोग​

​बाल्कनीचा करू शकता असा उपयोग​

बाल्कनीमध्ये नेहमीच खुर्ची अथवा सामान ठेवायला जागा असे समजण्यात येते. मात्र तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असा क्लासी लुकही देऊ शकता. रात्रीच्या वेळी आपल्या घरातल्या माणसांसह गप्पा मारण्यासाठी ही परफेक्ट जागा ठरते. घरात लहानशी पार्टी असेल आणि ७-८ माणसांना गप्पा मारायच्या असतील हा लुक उत्तम ठरेल.

​घराबाहेरील गो ग्रीन लुक ​

​घराबाहेरील गो ग्रीन लुक ​

घराबाहेर जर जागा असेल आणि तुम्ही तळमजल्यावर राहात असाल तर गो ग्रीन लुकसाठी नक्की प्रयत्न करा. आऊटडोअर प्लांट्सने घराबाहेर जागा सजवा. गौरी खानच्या या फोटोतील झाडाप्रमाणेच असं नाही मात्र लहान लहान कुंड्यांचा वापर करून ही तुम्ही सजावट करू शकता.

हेही वाचा :  समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील 'या' पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा

​गॅलरीतील बैठक​

​गॅलरीतील बैठक​

गॅलरी मोठी असो वा लहान तुम्ही अशा युनिक पद्धतीचे फर्निचर तयार करून अशी बैठक नक्कीच तयार करू शकता. त्यासह इनडोअर प्लांट्सची मदत घेऊन अधिक रॉयल लुक आणि नैसर्गिकपणा देण्याचा प्रयत्न करू शकता.

गौरी खानच्या या इंटिरिअर लुकवरून प्रेरणा घेत तुम्हीही तुमच्या घराची रॉयल सजावट नक्कीच करू शकता. कदाचित इतके महाग नाही मात्र त्याच पद्धतीचे डिझाईन वापरून वेगळा लुक द्यायला काय हरकत आहे नाही का?

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …