आलिशान घर आणि क्लासिक फर्निचर, अशी आहे श्रेया बुगडेच्या घराची सुबक मांडणी

श्रेया बुगडे ही खरं तर व्हर्सटाईल अभिनेत्री आहे मात्र कॉमेडीमध्ये तिचा हात कोणीच धरू शकत नाही. श्रेया बुगडे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचली. याआधीही तिने अनेक काम केलं आहे मात्र या कार्यक्रमामुळे तिला वेगळी ओळख मिळाली. खऱ्या आयुष्यात मात्र श्रेया अत्यंत स्टायलिश आणि क्लासी आहे. हे तिच्या होम डेकॉरवरूनही कळून येतं. घरातील फर्निचर, अगदी कप-बशांपासून सर्वच श्रेयाने क्लासी निवडलं आहे. श्रेयाचं घर नक्की कसं आहे आणि तिच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात कशा प्रकारे होम डेकोर करू शकता जाणून घ्या. (फोटो सौजन्य – @shreyabugde Instagram)

​हिरव्यागार झाडांनी सजलेलं अंगण​

​हिरव्यागार झाडांनी सजलेलं अंगण​

श्रेयाने तिच्या घराचं अंगण संपूर्णतः नैसर्गिक असं ठेवलं आहे. मातकट रंगाच्या टाईल्स आणि त्यावर हिरव्यागार झाडांची लागवड. मोठमोठ्या कुंड्या ज्यामुळे घराला एक वेगळंच घरपण येतं आणि याशिवाय घराला चांगला थंडावा मिळतो. श्रेया बरेचदा या झाडांच्या अवतीभोवती फोटो काढताना दिसून येते.

​लिव्हिंग रूममधील फोटो फ्रेम्सचे डेकोर ​

​लिव्हिंग रूममधील फोटो फ्रेम्सचे डेकोर ​

लिव्हिंग रूम म्हटली की घरात पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर आतील घराच्या सजावटीचा अंदाज येणारी रूम. श्रेयाची लिव्हिंग रूम अत्यंत सुंदर असून सोफा सेट आणि ऑफ व्हाईट रंगाच्या भिंतींवर तिचे आणि नवरा निखिल शेठचे अनेक फोटो आणि अनेक चित्रांच्या फोटो फ्रेम्स त्यांनी लावल्या आहेत. जे पाहिल्यावर मनाला नक्कीच सुखद वाटतं. तुम्हीही तुमच्या घराची सजावट करताना ही सजावटीची कल्पना नक्कीच अंमलात आणू शकता.

हेही वाचा :  घराला द्या भारतीय टच, वापरा या सोप्या टिप्स

(वाचा – सुनील शेट्टीच्या लाडक्या आथिया आणि क्रिकेटर के एल राहुलचा लग्नसोहळा पार पडणारा ‘जहान’ बंगला आहे तरी कसा)

​लायटिंग आणि क्लासी मूर्ती​

​लायटिंग आणि क्लासी मूर्ती​

श्रेयाचं बाप्पा प्रेम तर सर्वांनाच माहीत आहे. तिच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी बाप्पाच्या फ्रेम आणि मूर्तीही दिसून येतात. तर ही एका कोपऱ्यात सोफ्याच्या बाजूला ठेवलेली मूर्ती श्रेयाच्या घराच्या सजावटीचा एक नमुना आहे. ऑफव्हाईट रंगाच्या भिंती आणि त्यालाच साजेसा सोफा मात्र त्यावर रंगबेरंगी कुशन कव्हर आणि लक्षवेधी असे कंदीलचे लायटिंग घराची शोभा अजून वाढवत आहे. रात्रीच्या वेळी असा कोपरा पकडून आपला स्वतःचा वेळ दिल्यास, नक्कीच भारी वाटेल.

(वाचा – Sushant Singh Birthday: सुशांत सिंह राजपूतने ज्या घरात दिला जीव तेच घर सजवले होते प्रचंड प्रेमाने, सूर्यताऱ्यांमध्ये रमवायचा जीव)

​खिडकीजवळील एकांत​

​खिडकीजवळील एकांत​

सकाळच्या वेळात अथवा सुट्टीच्या दिवशी दुपारच्या वेळात पुस्तक, खेळती हवा आणि प्रकाश यांच्या सान्निध्यात बसता यावं अशी सुंदर जागा श्रेयाने घरात निर्माण केली आहे. तर खिडकी हा प्रत्येकाच्या मनातील हळवा कप्पा असतो आणि घरातील अशी एक जागा तुम्हीही करून घेऊ शकता.

हेही वाचा :  Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अडचणीत

​क्लासी लाकडी फर्निचर​

​क्लासी लाकडी फर्निचर​

श्रेयाच्या घरात ठिकठिकाणी लाकडी फर्निचर दिसून येते. त्यातही तिने क्लासी आणि डिझाईनिंगच्या लाकडी फर्निचर्सची निवड केलेली दिसून येते. तुम्हीही घरामध्ये असे फर्निचर वापरू शकता. यामुळे घराचा लुक अगदीच बदलून जातो. जेव्हा तुम्हाला घराची सजावट करायची असेल आणि फर्निचरवर लक्ष केंद्रीत करायचे असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे फर्निचर निवडा.

​रॉयल क्रॉकरी सेट आणि हेरिटेज लुक खुर्ची​

​रॉयल क्रॉकरी सेट आणि हेरिटेज लुक खुर्ची​

श्रेया अनेकदा नाश्ता अथवा ब्रंचचे फोटोही पोस्ट करत असते. मात्र तिचा क्रॉकरी सेट पाहून आपल्याकडेही असाच क्रॉकरी सेट हवा असे नक्कीच एकदा तरी मनात येतेच. क्रॉकरीच्या बाबतीत श्रेयाची निवड अगदीच रॉयल आहे. रंग, सेट आणि लुक या तिन्ही गोष्टींचा सुंदर मेळ दिसून येतो. तर अंगणात सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीने एकत्र नाश्ता करणे हा उत्तम विचार आहे. त्यासाठी हेरिटेज लुक असणाऱ्या खुर्च्याही कमाल आहेत.

(वाचा – डोळे दिपतील असा ईशा अंबानीचा लॉस एंजेलिसमधील बंगला, इंटिरिअर पाहून राजमहालच वाटेल)

​बाल्कनीतील झोपाळा​

​बाल्कनीतील झोपाळा​

झोपाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बाल्कनीमध्ये झोपाळा आणि त्यावर सुंदरशी बैठक अशी सजावट श्रेयाने केली आहे. तर मोकळी बाल्कनी आणि त्यामध्ये शांतता मिळण्यासाठी कधीही बसता येऊ शकते. अशी सजावट तुम्हीही तुमच्या बाल्कनीत करू शकता. यामध्ये मागे मातीची भांडीही दिसून येतात. त्यामुळे मराठमोळी परंपराही जपताना श्रेया दिसून येते.

हेही वाचा :  कांद्याचा प्रश्न पेटलाच कसा! शेतकऱ्यांच्या संपापापासून केंद्राच्या निर्णयापर्यंत; वाचा, नेमकं काय घडलं!

​फुलांची अप्रतिम सजावट​

​फुलांची अप्रतिम सजावट​

बरेचदा श्रेया फुलांची सजावट करताना दिसून येते. त्यामुळे तिला फुलांची आवड आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. याशिवाय अनेक वेगवेगळ्या फुलांची सजावट ती वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसून येते. लिव्हिंग रूमच्या काचेच्या टेबलावर अशी सजावट घरात सकारात्मकता घेऊन येते. त्यामुळे तुम्हीही यावरून प्रेरणा घेऊन घराची सजावट अशा पद्धतीने करू शकता.

श्रेया बुगडेची स्टाईल जितकी क्लासी आहे तितकीच तिच्या घराची सजावटदेखील. तुम्हीही तुमचे घर सजविण्याचा विचार करत असाल तर श्रेयाच्या होम डेकोरवरून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …