पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर…

Delivery Boy’s Wife Absconding: ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा टिंकू यादव याने लाखो रुपये खर्चून आपल्या पत्नीला शिकवले मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीने त्याला दगा दिला. पत्नीने धोका दिल्यानंतर टिंकू यादव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी त्यांने नगर ठाण्यात त्याच्या पत्नी व प्रियकराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. 

कठौन गावचे रहिवाशी असलेल्या टिंकू यादव याचे लग्न बढौना परिसरातील प्रियाकुमारी सोबत झाले होते. लग्नानंतर त्याच्या पत्नीला पुढे शिकायचे होते. ती हुशारदेखील होती. त्यामुळं आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानादेखील त्याने तिला शिकवण्याचे ठरवले जेणेकरुन तिचे पुढील भविष्य सुखकर होईल. त्याने शकुंतला नर्सिंग स्कुलमध्ये नर्सिंग कोर्ससाठी तिला प्रवेश मिळवून दिला. 

नर्सिंग कोर्सची फी 2.5 लाख रुपये असल्यामुळं कर्ज काढून त्याने पत्नीचे शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर दीड वर्षांतच टिंकूच्या पत्नीचे आणि शेजारी राहणाऱ्या दिलखुश राऊत याच्यासोबत प्रेम जमलं. दोघाचे लग्नानंतर अफेअर सुरू होते. पण कोर्स पूर्ण होताच टिंकूची पत्नी त्याला सोडून प्रियकरासोबत फरार झाली. टिंकूला जेव्हा याबाबत कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. 

हेही वाचा :  मुलीने रचली स्वत:च्या अपहरणाची कहाणी, घरच्यांना पाठवला अर्धनग्न व्हिडिओ; 'ती' एक चूक...

टिंकूने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पत्नीला ANMची पदवी घेण्यासाठी प्रयत्न केले. नर्सिंग कॉलेजमध्येही अॅडमिशन करुन दिले. दिवस-रात्र मेहनत करुन तिची कॉलेजची फी भरली. मात्र तिच त्याला धोका देईल असं त्याने कधी स्वप्नात पण विचार केला होता. 

पत्नी प्रिया कुमारी 17 सप्टेंबर रोजी कॉलेज संपल्यानंतर तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. दिल्लीला जाऊन तिथे कोर्ट मॅरेज केले व सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. टिंकूला मात्र, पत्नीने लग्न केल्याची माहिती 24 सप्टेंबर रोजी झाली. पत्नीने धोका दिल्याचे कळताच त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टिंकूने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. तर, ही बातमी समोर येताच दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकारी उपेंद्र महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. तक्रार मिळाल्यानंतर दोन्ही पक्षाकडील लोकांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. सगळ्याबाबी तपासून चौकशी करण्यात येत आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …