घर सजविण्यासाठी जास्त पैशांची गरज नाही भासणार, वापरा या युक्ती

आपलंही घर सुंदर आणि इंटिरिअर डिझाईन्सप्रमाणे दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. पण इंटिरिअर डिझाईन्स करून घेणं प्रत्येकाच्या खिशाला परवडतं असं नाही. घर सजविण्याचा छंद केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही असतो. आपलं घर सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करताना तोंडाला फेस येतो. तुम्हाला जर तुमच्या घराच्या सजावटीसाठी वस्तू खरेदी करायच्या असतील आणि Home Interior Design For Low Cost असा तुमच्या डोक्यात विचार असेल तर तुम्ही या आयडिया नक्की फॉलो करायला हव्यात. कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही संपूर्ण घराचे डिझाईन करू शकता.

भिंतींपासून करा सुरूवात

घराला रंग देणे हे सर्वात मोठे खर्चिक काम आहे. भिंतीचा रंग हा घराचा लुक अधिक आकर्षक दाखविण्याचे काम करतो. तुम्ही जर योग्य रंगांची निवड केली तर लहानसे घरही आलिशान दिसते. इंटिरिअर डिझाईनर बरेचदा हे काम उत्तम करतात. घराचा रंग काढण्यासाठी आता जर तुमचे बजेट नसेल तर तुम्ही त्यासाठी वॉलपेपर्सचा वापर करू शकता. बाजारामध्ये एकापेक्षा एक उत्तम डिझाईन्सचे वॉलपेपर्स मिळतात. महत्त्वाचे म्हणजे या वॉलपेपर्सची किंमत रंगांच्या तुलनेमध्ये खूपच कमी असते आणि त्याशिवाय घराला एक वेगळेपण देण्याचे काम हे वॉलपेपर्स करतात. तुमच्या आवडीप्रमाणे याचे डिझाईन्स निवडून भिंतीवर लावा. घराला वेगळा लुक येतो आणि खर्चही कमी होतो.

हेही वाचा :  इंटिरिअरच्या साम्राज्यात का ठरते गौरी खान ‘क्वीन’, होम डेकोरसाठी मिळेल रॉयल लुकची प्रेरणा

जुन्या फर्निचर्सचा करा मेकओव्हर

घराला तोचतोचपणा आला असेल आणि कंटाळवाणे वाटत असेल तर तुम्ही घरातील जुने फर्निचर काढून टाकण्याचा विचार नका करू. तर हेच जुने फर्निचर अर्थात जुन्या खुर्ची, सोफा यांचा पुनर्वापर करून वेगळे डिझाईन करू शकतो. सोफ्याचे कव्हर बदला अथवा जुन्या बेडचा सोफा तयार करा आणि त्याची घरातील जागा बदला. तसंच आपली क्रिएटिव्हिटी दाखवत घरातील लहान मुलांसाठी बेडचा झोपाळा तयार करून घ्या. जुने फर्निचर वापरून तुम्ही वेगळे फर्निचर तयार करू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घराला वेगळेपण देण्यासाठी ही सोपी आयडिया आहे. यामुळे तोचतोचपणा दिसून येत नाही आणि एक फ्रेशनेस दिसतो.

(वाचा – घरात खेळती हवा राहण्यासाठी असे सजवा घर, सिद्धार्थ-मितालीचा घ्या आदर्श)

बेडरूमच्या भिंतींवर शेल्फ

बेडरूममध्ये पसारा होत असेल तर ते टाळण्याचा प्रयत्न करा. बेडरूमच्या जागेनुसार तुम्ही भिंतींवर शेल्फ तयार करून घ्या. अथवा ऑनलाईन शेल्फची ऑर्डर द्या आणि ते घरात बेडरूममध्ये लावा. यामुळे बेडरूममधील वस्तू तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकता आणि पसारा राहात नाही. तसंच बेडरूम सुंदर दिसते. यामध्ये शो पीस, पुस्तकं इत्यादी ठेऊन तुम्ही रूमचा लुक वेगळा करू शकता.

हेही वाचा :  ‘चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेच्या साध्या पण प्रेमाने भरलेल्या घराची झलक, मनात भरणारे इंटिरिअर

(वाचा – Get Rid Of Mosquito : आता ७ नंतरही घराबाहेर राहा, घरच्या घरीच बनवा डासांपासून सुरक्षित राहण्याचे औषध)

लायटिंगचा वापर करून घ्या

घरात केवळ दिवाळीतच लायटिंग असावं असं अजिबात नाही. काचेच्या बाटल्यांचा वापर करून घरात सजावट करू शकता. तसंच वेगवेगळ्या फ्रेम्सचा भिंतीवर वापर करून त्यावर लायटिंग केल्यास अधिक सुंदर दिसते. लिव्हिंग रूमसाठी स्ट्रिंग लायटिंगचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. याशिवाय बेडरूममध्येही याचा वापर करू शकता. भिंतींवर लावण्यासाठीही तुम्हाला कमी बजेटची फॅन्सी लाईट्स मिळतील. तसंच लाईट्स लावल्याने घरातील वातावरणही सकारात्मक राहाते आणि ऊर्जात्मक राहाते.

(वाचा – घरच्या घरी असं बनवा सुगंधी व झटपट एअर फ्रेशनर, घरातील वातावरण कायम राहिल ताजतवाणं व पॉझिटिव्ह)

इनडोअर प्लांट्सचा वापर

घर केवळ शो पीस ने भरू नका. यासाठी तुम्ही गॅलरी, लिव्हिंग रूम आणि अगदी बेडरूममध्येही इनडोअर प्लांट्सचा वापर करू शकता. यामुळे घरात ऊर्जा टिकून राहाते आणि आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. टेबलवर हे ठेवल्याने जागाही व्यापली जात नाही आणि दिसायलाही सुंदर दिसते. तुमचे घर आणि मोठ्या खोल्या असतील तर मोठ्या कुंड्यांचा वापरही करू शकता.

हेही वाचा :  आलिशान घर आणि क्लासिक फर्निचर, अशी आहे श्रेया बुगडेच्या घराची सुबक मांडणी

(वाचा – ‘या’ 5 शहरांतून थेट व्हिएतनामला पोहोचा, विमानात मिळेल भारतीय जेवणासोबतच दिसणारा नजारा असेल खूप खास)

जुन्या बॉक्सपासून बनवा टेबल

अनेकदा घरांमध्ये भक्कम बॉक्स असतात. एकापेक्षा अधिक बॉक्स असतील तर फेकून न देता हे बॉक्स तुम्ही रंग आणून पेंट करा आणि त्यावर चांगला कपडा आणि सुंदर डिझाईन असणारी चादर घालून त्यावर फुलांचा वास ठेवा अथवा त्यावर उशा ठेऊन लहान मुलांना बसण्यासाठी जागा तयार करा. यामुळे खोलीची शोभा वाढते आणि उपयोगही होतो. तसंच इंटिरिअर डिझायनिंगप्रमाणे याचा लुक दिसतो.

घरातील वस्तूंचा वापर करूनच तुम्ही तुमच्या घरातील डिझाईन्स करू शकता. यामुळे पैसेही वाचतात आणि घराचा लुकही बदलतो.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …