Suniel Shetty च्या दिवसाची सुरूवात होते या पदार्थाने, ६१ व्या वर्षी जावई KL Rahul ला लाजवेल असा Fitness

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा फिटनेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनील शेट्टीच्या मुलीचं नुकतंच क्रिकेटर के.एल.राहुलसोबत पार पडलं. यावेळी सुनील शेट्टीच्या अटायरची जोरदार चर्चा झाली. त्याचा फिटनेस आणि त्याचा ६१ व्या वर्षी असलेला आहार हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अण्णाने चक्क भात खाऊन आपला इतका चांगला फिटनेस ठेवला आहे. अभिनेता सुनील शेट्टीचं रुटीन काय असतं? आणि त्याच्या फिटनेसचं रहस्य काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – Suniel Shetty इंस्टाग्राम)

सुनील शेट्टीच्या फिटनेसच रहस्य आहे भात

सुनील शेट्टीच्या फिटनेसच रहस्य आहे भात

तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही पण अभिनेता सुनील शेट्टीच्या दिवसाची सुरूवात चक्क भाताने होते. सुनील शेट्टीचा फिटनेस आजही त्याच्या मुलाला आणि जावयाला लाजवेल असाच आहे. सुनील शेट्टीच्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो पाहायला मिळतात.

(वाचा – सुनील शेट्टीच्या लाडक्या आथिया आणि क्रिकेटर के एल राहुलचा लग्नसोहळा पार पडणारा ‘जहान’ बंगला आहे तरी कसा)

हेही वाचा :  या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’

सुनील शेट्टीचं वर्कआऊट रुटीन

सुनील शेट्टीचं वर्कआऊट रुटीन

सुनील शेट्टीचा दिवस पहाटे ५ वाजता होतो. तो जवळपास दोन तास कसरत करतो. सुरूवातीचा एक तास योग आणि प्राणायाम करतो. त्यानंतर ४५ मिनिटे जिममध्ये घाम गाळतो. एकदा सुनील शेट्टीने सांगितलं होतं की, त्याला जिममध्ये जाणं पसंत नव्हतं. तेव्हा तो पुलअप्स, पुशअप्स, सूर्यनमस्कार, दंड बैठका आणि योग अशी वेगवेगळी आसने करत असे. तसेच तो मार्शल आर्ट्स देखील करतो. तसेच अभिनेता सुनील शेट्टी आपल्या वयामानानुसार एक्सरसाइज करतो. तो या सगळ्या गोष्टींची खास काळजी घेतो. तसेच योगामुळे त्याला अतिशय खास वाटते.

(वाचा – RRR सिनेमातील अभिनेत्याने अशी केली डिप्रेशनवर मात, दिग्दर्शक राजामौलीने दाखवला हा मार्ग)

डाएटची घेतो खास काळजी

डाएटची घेतो खास काळजी

सुनील शेट्टी आपल्या डाएटमध्ये खास काळजी घेतो. सुनील शेट्टी आपल्या डाएटमध्ये आलू पराठा, पुरी भाजी, भात या सगळ्याचा समावेश करतो. मात्र याच्या प्रमाणाकडे तो खास लक्ष देतो. अभिनेता आपल्या दिवसाची सुरूवात भाताने करतो. त्याचं असं म्हणणं आहे की, यामध्ये कॅलरीज सर्वाधिक असतात. यामुळे भात आहारातून हटवण्याची काहीच गरज नाही. तसेच भातामध्ये विटामीन बी देखील अधिक प्रमाणात असते. सुनील शेट्टी प्रोटीन शेक आणि सप्लीमेंट्स देखील घेत नाही. त्याला जंक फूड आणि या गोष्टी अजिबात आवडत नाहीत.

हेही वाचा :  अथिया आणि केएल राहुल फक्त 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत अडकणार लग्नबंधनात

(वाचा – जिम, डाएट सोडा आणि फक्त Tapeworm Diet फॉलो करा, अक्षरशः चरबी वितळवेल ही गोळी)

डाएटिंग नाही संतुलित आहार महत्वाचा

डाएटिंग नाही संतुलित आहार महत्वाचा

सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ज्यामुळे ते गोंधळात पडत आहेत आणि फिट होण्यासाठी पैसेही वाया घालवत आहेत. पण तंदुरुस्त राहण्यासाठी हे करण्याची गरज नाही. घरी बसून संतुलित आहार घेऊन तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. अशा परिस्थितीत, इतर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा.

(वाचा – पायांना घाणेरडा वास येतोय? याचे कारण फक्त शूज नाही, तर किडनी – रक्ताच्या सडण्यासारख्या ६ आजारांचे आहेत संकेत)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …