‘चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेच्या साध्या पण प्रेमाने भरलेल्या घराची झलक, मनात भरणारे इंटिरिअर

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून अनेक भूमिका करून सागर कारंडेने आपले एक स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले. विशेषतः पत्र वाचणारा पोस्टमन तर सागरशिवाय कोणाची साकारू शकत नाही इतक्या ताकदीची ही भूमिका त्याने साकारली. सागर खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा आणि मनमिळावू आहे. त्याच्याकडे पाहूनच त्याच्या घराच्या इंटिरिअरचीही कल्पना करू शकतो.

साधे मात्र मनमोहक आणि प्रेमाने भरलेले घर इतकेच वर्णन सागरच्या घराचे होऊ शकते. हाच साधेपणा जपत सागर आणि त्याच्या बायकोने घराचे इंटिरिअर ठेवलेले दिसून येते. तुम्हीही सागरच्या या घराच्या इंटिरिअरवरून प्रेरणा घेऊन आपल्या घराचे इंटिरिअर ठरवू शकता. (फोटो सौजन्य – @saagarkarande Instagram)

खिडकीजवळील खास जागा

खिडकीजवळील खास जागा

प्रत्येकाच्या घरातील खिडकीजवळील एक खास जागा ठरलेली असते. बाहेरच्या जगाशी संपर्क राहावा आणि अगदी एकांतातही एकटक बाहेर पाहात राहावे अशी खिडकी. सागरच्या घरातीलदेखील अशीच जागा दिसून येत आहे. आजकाल घराची उघडी खिडकी फारच कमी दिसून येते. मात्र सागरच्या घराची ही खिडकी पाहून घरात हवा हसतीखेळती राहण्यासाठी परफेक्ट इंटिरिअर वाटते.

हेही वाचा :  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद ओकचे घर आहे आशियाना, इंटिरिअरने डोळे दिपतील

लाकडी फर्निचर

लाकडी फर्निचर

लिव्हिंग रूममध्ये सागरने पुरस्कार ठेवण्यासाठी आणि काही खेळणी ठेवण्यासाठी एक लाकडी फर्निचर करून घेण्यात आले आहे. घरात पसारा कमी करण्यासाठी तुम्ही असा विचार नक्कीच करू शकता. कधी कधी वस्तू कुठे ठेवायच्या अशा विचार असेल तर भिंतीमध्येच असे कप्प्याचे लाकडी फर्निचर करून घेता येऊ शकते.

(वाचा – समुद्रकिनाऱ्याची रोज अनुभूती, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या आलिशान घरातून दिसतो अथांग समुद्र)

टी.व्ही. टेबल फर्निचर

टी.व्ही. टेबल फर्निचर

अनेकदा लिव्हिंग रूममध्ये टी.व्ही. ठेवला जातो. पण मग बाकीची जागा मोकळी राहाते. त्याऐवजी टी. व्ही. टेबल फर्निचर करून घेतले तर घरातील काही सामान ठेवायला या कप्प्यांचा उपयोग करून घेता येतो. सागरच्या घरातही लिव्हिंग रूममध्ये हीच आयडीया वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे.

(वाचा – १०० कोटीचा आलिशान बंगला, शिल्पा शेट्टीच्या घराचे इंटिरिअर पाहाल तर म्हणाल हा तर राजवाडाच)

बाप्पासाठी जागा

बाप्पासाठी जागा

घरात गणपती आल्यानंतर बरेचदा कुठे आरास बसवायची असा प्रश्न असतो. तर त्यासाठी योग्य लाकडी टेबलाचा वापर करून लिव्हिंग रूममध्येच एका बाजूला आरास करता येऊ शकते. तसंच बाप्पा नसताना याचा उपयोग स्टडी टेबल अथवा डायनिंग टेबल म्हणूनही करता येऊ शकतो. हे टेबल फोल्डिंग असेल तर जागाही वाचते आणि हवं तसं वापरता येऊ शकते.

हेही वाचा :  ‘चला हवा येऊ द्या’ शो मधून ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता घेणार ब्रेक, समोर आले कारण

(वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद ओकचे घर आहे आशियाना, इंटिरिअरने डोळे दिपतील)

भिंतीवरील युनिक फ्रेम्स

भिंतीवरील युनिक फ्रेम्स

भिंतीवर आपल्या फोटोफ्रेम्सच असायला हव्यात असे नाही तर हल्ली अनेक होम कॅप्शन अथवा पॉझिटिव्ह वाईब्स असणाऱ्या कॅप्शन फ्रेम्स मिळतात. ऑफ व्हाईट अथवा लाईट रंगाच्या भिंतींवर अशा फ्रेम्स अधिक उठावदार दिसतात. सागरच्या घरातही अशा फ्रेम्स दिसून येतात. तुम्हीही याचा वापर करून घेऊ शकता.

साधे पडदे

साधे पडदे

घराला पडद्यांमुळे एक वेगळीच शोभा येते. साधे तरीही डोळ्याला सुखद अनुभव देणारा असा रंग निवडून तुम्ही घरातील खिडक्यांना पडदे लाऊ शकता. कोणते पाहुणे येणार आहेत अथवा कोणता सण आहे याप्रमाणे तुम्ही पडद्यांची निवड बदलून त्याप्रमाणे पडद्यांचा बदल करावा.

साधे मात्र तितकेच आकर्षक घर सजवायचे असेल तर सागरच्या घराच्या इंटिरिअरवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. घर हे प्रेमाने अधिक सुंदर दिसते आणि सागरचे फोटो पाहताना हे आवर्जून जाणवते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …