Maharashtra Monsoon News: पुढील 5 दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागांना IMD कडून अलर्ट जारी!

IMD Rain Alert: राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईसह पुण्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानंतर पुण्यातील विविध भागात चांगला पाऊस झाल्याचं दिसून येतंय. पुण्याच्या लवासा येथे गेल्या 12 तासांत 99.5 मिमी पाऊस झाला आहे. उर्वरित ठिकाणी आतापर्यंत हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून (Monsoon News) महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी ऑरेंज (Orange alert) आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे (Pune Rain News), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, वर्षा, जालना, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा :  अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

कल्याण डोंबिवली मुसळधार

गेले तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत परिसरात सुरू असलेला रिमझिम पावसाने आज संध्याकाळी सहा वाजता चांगलाच जोर धरला. गेल्या अर्धा तासाच्या मुसळधार पावसामुळे कल्याण ग्रामीण येथील आडीवली – ढोकळी परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला असून पर्याय व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना याच रस्त्यातून मार्ग काढून वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. तर काही रिक्षा बंद देखील पडल्या अधून मधून पाऊस विश्रांती घेत असल्याने हळूहळू रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत आहे. मात्र पाण्याचा जोर वाढला तर कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालाय. आज सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अखेर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उकड्यापासून हैरान झालेला नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसापासून इंदापूर मध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. आज मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस इंदापूर शहरासह परिसरात झाला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय.

लातूरात पावसाने धरला जोर 

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज दुपारपासूनच लातूर शहर आणी परिसरात ढगाळ वातावरण होतं. दिवसभरात पावसाच्या अनेक वेळेस हलक्या सरी बरसून गेल्या होत्या. मात्र 4 च्या नंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जोरदार पावसाने हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केला आहे. लातूर शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचले आहे. शहरात अनेक ठिकाणी नालेसफाईचे काम झालं नसल्याकारणाने रस्त्यावर पाणी वाहत होतं. रस्ता बनवायला असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडसर निर्माण झाला आहे.

हेही वाचा :  मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

सांगलीत संततधार सुरू 

सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये आता मान्सूनच्या पाऊसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून सांगली शहरासह मिरज आणि जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे,गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळे सर्वसामान्यांच्या बरोबर शेतकरी वर्गात ही आनंदच वातावरण पसरलेला आहे,तर संततधार सुरू झालेल्या पाऊसामुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांना देखील आता वेग आला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …