Maharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

Maharashtra Weather update: राज्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने (IMD) दिली आहे. तसेच मेघगर्जेनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुण्यात (Pune News) 4 वाजताच पडला अंधार पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. (Maharashtra Weather update Farmers should beware Orange Alert issued of the state latest marathi news)

कोणत्या भागांना अलर्ट ?

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा , जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पुण्यात दुपारनंतर मेघगर्जेंनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचं हवामान शास्त्रज्ञ ज्योती सोनार यांनी सांगितलं आहे.

पुणे शहराला पावसाचा तडका 

पुण्यात (Pune Rain News) विविध भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस दिसून आलं. शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून आलंय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आता बळीराजा चिंतेत असल्याचं दिसतंय.

रायगडमध्ये गारांचा पाऊस

दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरणानंतर गारांचा पाऊस पडला. महाड तालुक्यातील दासगाव वहूरमध्ये गारा पडल्या आहेत. सकाळपासून आकाश दाटून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पाऊस पडल्याने हवेत गारवा दिसून येतोय. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणि विटभट्टीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

हेही वाचा :  देवदर्शनावरुन परतणाऱ्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू; कार कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

आणखी वाचा – Mumbai Rain : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळणी पाऊस झालाय,कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा डोंगरकडा,बाळापूर परिसरात अर्धा तास पाऊस झालाय,यामुळे गहू,केळी,आंबा,टरबूज (कलीगंड) संत्रा,ज्वारी पिकाचे नुकसान झालंय. सकाळ पासूनच आभाळ भरून आलं होत, सायंकाळच्या वेळी जोराचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …