अक्षय आणि इमराननं मेट्रोमध्ये ‘मैं खिलाडी, तू आनाडी’ गाण्यावर केला डान्स

Akshay And Emraan In Mumbai Metro: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटामधील ‘कुडीये नी तेरी’ हे गाणं देखील रिलीज झाले होते. सध्या अक्षय आणि इमरान हे या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाचे हटक्या पद्धतीनं प्रमोशन करत असतात. आता सेल्फी या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अक्षय आणि इमराननं  मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्यांनी  ‘मैं खिलाडी, तू आनाडी’  या गाण्यावर डान्स देखील केला. नुकताच त्यांचा मुंबई मेट्रोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डी एन नगर मेट्रो स्टेशनवर थांबलेल्या मेट्रोमध्ये इमरान आणि अक्षय हे दोघे चढले. मेट्रोमध्ये असताना त्यांनी मास्क परिधान केला होता. त्यामुळे मेट्रोमधील लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यानंतर मेट्रोमध्ये असतानाच त्या दोघांनी मास्क काढला आणि  ‘मैं खिलाडी, तू आनाडी’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर अक्षय आणि इमरान यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मेट्रोमधील प्रवाशांनी गर्दी केली. 

हेही वाचा :  अजय देवगण नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, एक झलक पाहण्यासाठी असायची उत्सुक

पाहा व्हिडीओ


‘या’ दिवशी सेल्फी येणार प्रेक्षकांच्या भेटीस 

24 फेब्रुवारी रोजी अक्षय आणि इमरान यांचा सेल्फी हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. सेल्फी या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे.  सेल्फी या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकूर,  नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

सेल्फीबरोबरच अक्षयचे काही चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘वेडात मराठे, वीर दौडले सात’ या चित्रपटात देखील अक्षय कुमार काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser: अक्षयचे सिक्स पॅक्स अन् मृणालचा ग्लॅमरस अंदाज; ‘सेल्फी’ मधील गाण्याचा टीझर रिलीज

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …