‘टायगर 3’ ते ‘सेल्फी’, येत्या वर्षांत इमरान हाश्मीचे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Emraan Hashmi Upcoming Movies : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आज त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. 2003 साली फिल्मी विश्वात एंट्री केलेल्या इमरान हाश्मीला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.  पण, अभिनेत्याला त्याची सीरियल किसर इमेज तोडायला बरीच वर्षे लागली. सध्या, इमरान हाश्मी त्याच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याची ही प्रतिमा देखील पुसली गेली आहे आणि चित्रपट निर्माते त्याला आव्हानात्मक भूमिका देण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

गेल्या काही वर्षांत इमरानने पडद्यावर कठीण भूमिकाही साकारल्या आहेत. इमरानकडे सध्या बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट आहेत. येत्या वर्षांत तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

टायगर 3

सलमान खानच्या ‘टायगर 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, आता त्याचा ट्रेलर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. या चित्रपटात सलमानच्या सोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर इमरान हाश्मीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून इमरान या चित्रपटासाठी जिममध्ये खूप घाम गाळत आहे. ‘टायगर 3’मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :  Alia Bhatt : रणबीर कपूरला कसा वाटला गंगूबाई काठियावाडी? आलियाने दिले उत्तर  

सब फर्स्ट क्लास है

‘सब फर्स्ट क्लास है’ हा कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाची घोषणा 2020 मध्येच झाली होती. चित्रपटाची कथा एक सामान्य माणूस आणि त्याच्या स्वप्नांभोवती फिरते. ‘सब फर्स्ट क्लास है’ हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सेल्फी

‘सेल्फी’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांना इमरान हाश्मी आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘सेल्फी’ हा 2019 मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

फादर्स डे

इमरान हाश्मीच्या या आगामी चित्रपटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शंतनू बागची याचं दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी डिटेक्टीव्ह सूर्यकांत भांडे यांची भूमिका साकारणार आहे, ज्यांनी 120 मुलांचे अपहरण प्रकरण सोडवले होते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …