अक्षय आणि मृणालचा रोमँटिक अंदाज; ‘सेल्फी’ मधील गाण्याचा टीझर रिलीज

Selfiee song Kudiyee Ni Teri teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील ‘कुडीये नी तेरी’ (Kudiyee Ni Teri) या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. ‘कुडीये नी तेरी’ गाण्याचा 17 सेकंदाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अक्षय आणि मृणालची रोमँटिक केमिस्ट्री

‘कुडीये नी तेरी’ गाण्याच्या टीझरमध्ये अक्षय आणि मृणाल ठाकूरची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. या टीझरमध्ये अक्षयच्या सिक्स पॅक्स अॅब्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर गाण्याच्या टीझरमधील मृणालचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अक्षयनं ‘कुडीये नी तेरी’ गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, ‘रेडी टू रॉक विथ ‘कुडीये नी तेरी’? गाणं 9 फेब्रुवारी रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस.’ अक्षयनं शेअर केलेल्या गाण्याच्या टीझरवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. या टीझरला एका यूझरनं कमेंट केली, ‘खिलाडी इज बॅक’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं, ‘चांगलं गाणं आहे.’

हेही वाचा :  अरबोंची संपत्ती, एअर लाईन्सचा मालक अभिनेता रामचरण! जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी...

पाहा टीझर:


सेल्फी चित्रपटाची स्टार कास्ट

सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतच इमरान हाश्मी (Emraan Hashmi), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सेल्फी हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षयच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सेल्फी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.  या चित्रपटामध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना पहायला मिळेल, असा अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरमधून लावला जाऊ शकतो. सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Selfiee Trailer: फॅन, सुपरस्टार आणि ‘सेल्फी’ची गोष्ट; अक्षय आणि इमरानच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …