अक्षय आणि इमरानच्या ‘सेल्फी’ चा ट्रेलर पाहिलात?

Akshay Kumar-Emraan Hashmi Selfiee Trailer: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता  इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा  ‘सेल्फी’ (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात एक चाहता आणि एक सुपरस्टार यांच्यामधील नाते दाखवण्यात आले आहे.  अक्षय  हा या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाश्मी हा या चित्रपटात एका फॅनच्या भूमिकेत आहे. सेल्फीच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडी देखील दिसत आहे. 

एका फॅनची गोष्ट

सेल्फीच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, इमरान हा अक्षयचा फॅन आहे. इमराननं या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो अक्षयसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच नुसरुत भरुचा आणि  डायना पॅन्टी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे . सेल्फीच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

अक्षयनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन अक्षयनं त्याला कॅप्शन दिलं, ‘या गोष्टीचा खलनायक कोण आहे? हे माहित नाही, पण हिरो हा सेल्फी आहे.’ सेल्फी हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

हेही वाचा :  वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण!

पाहा ट्रेलर


सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या यु-ट्यूब चॅनलवर सेल्फीचा ट्रेलर शेअर करण्यात आला. ट्रेलर रिलीज होऊन अवघे काही तास झाले आहेत, तरी देखील या ट्रेलरला 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे.  

अक्षयचा मै खिलाडी तू अनाडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तो वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात देखील काम करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …