WhatsApp वर स्पॅम कॉल्सचा तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका? कंपनीने स्वत: सांगितल्या सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : Prevent WhatsApp Spam Calls : एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन म्हणून प्रसिद्ध व्हॉट्सॲप आजकाल कॉलिंगसाठीही मोठ्या प्रमाणात वापरतात. वॉईस कॉलिंगसह व्हिडीओ कॉलिंग एका क्लिकवर होत असल्याने आजकाल व्हॉट्सॲपचा वापर वाढला आहे. पण अशातच व्हॉट्सॲपद्वारे कॉलिंग स्कॅमही वाढले आहेत. त्यात आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अचानक कॉल येत आहेत. हे कॉल्स इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि इतर यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत. दरम्यान या कॉल्सच्या त्रासाबद्दल काय कराव? असे प्रश्न अनेक युजर्सने केल्यावर कंपनीने या नंबर्सना ब्लॉक करुन रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही दिवसांपासून या इंटरनॅशनल कॉल्समुळे सर्वजण त्रासले आहेत. अशात विविध युजर्स विविध तक्रारी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमाद्वारे करत आहेत. थेट व्हॉट्सॲपला देखील बऱ्याच तक्रारी येत आहेत. अशामध्ये कंपनी यावर काम करत असून तोवर अशा कोणत्याी संशयी नंबरवरुन आलेला कॉल ब्लॉक करुन रिपोर्ट करण्याचा सल्ला कंपनी देत आहे. तसंच मार्क झुकरबर्ग यांनी स्वत:ही सांगितलं की,व्हॉट्सॲपवर आपले पर्सनल डिटेल्स केवळ आपल्या कॉन्टॅक्टसाठीच व्हिजीबल ठेवा. अनोळखी व्यक्तींना आपली खाजगी माहिती डिस्प्ले होऊ देऊ नका, असं मार्क यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  WhatsApp चे खास फीचर्स आहेत एकदम खास, अनेकांना माहितही नाहीत...

अनोळखी कॉल होणार Mute
मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲपमध्ये नवनवीन फीचर्स येत आहेत. आता काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपमध्ये एक नवं फीचर येणार आहे, ज्यामुळे अनोळखी नंबरवरुन आलेला फोन व्हॉट्सॲपवर आपोआप सायलेंट होणार होता. आता लवकरच हे फीचर कंपनी घेऊन येणार आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार अॅन्ड्रॉईड 2.23.10.7 अपडेटसोबत या फीचरला कंपनी आणणार आहे. याच्या मदतीने अनोळखी नंबरवरुन येणारा फोन सायलेंट करु शकतो. अनोळखी नंबरला सायलेंट करण्यासाठीची सेटिंग व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनमध्ये असेल.ती सेटिंग ऑन करताच हे फीचर वापरता येईल. फोन सायलेंट झाल्यावर नंतर कळण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसेल

वाचाः WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …