World Sleep Day: झोपताना वरून पडल्याचा होतोय का भास? हे आहे महत्त्वाचं कारण

What Is Hypnic Jerk: झोपेत अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी जाणवत असतात. काही व्यक्ती झोपेत बोलतात, तर काही व्यक्ती झोपेत चालतात. पण काही जणांना उंचावरून पडत असल्याचा भास होतो. याला Hypnic Jerk असे म्हटले जाते. आपण वरून पडत आहेत असे जाणवून अचानक झोपेतून जागे व्हायला होते. साधारण ७० टक्के लोकांना हा अनुभव येतो असे म्हणतात.

वर्ल्ड स्लीप डे निमित्त आपण या झोपेच्या एका वेगळ्या बाजूविषयी जाणून घेऊया. Hypnic Jerk कशामुळे जाणवते आणि यामुळे नक्की काय परिणाम होतात हे आम्हाला डॉ. सत्यनारायण मैसूर, HOD आणि सल्लागार, प्लमोनोलॉजी, लंग ट्रान्स्प्लांट फिजिशियन, मणिपाल हॉस्पिटल, ओल्ड एअरपोर्ट रोड यांनी विस्तारित करून सांगितले आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

हायप्निक जर्क म्हणजे काय?

हायप्निक जर्क म्हणजे काय?

जागणं आणि झोपणं याच्या मधली अवस्था म्हणजे हायप्निक जर्क. असे झटके तेव्हाच जाणवतात जेव्हा व्यक्ती ना पूर्ण झोपेत असतो ना पूर्ण जागा असतो. साधारणतः झोपेच्या पहिल्या चरणामध्ये ही अवस्था येऊ शकते. हार्ट रेट आणि श्वास हळू होऊ लागतो तेव्हा ही जाणीव होते.

हेही वाचा :  खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

हायप्निक जर्क आजार?

हायप्निक जर्क आजार?

हायप्निक जर्क म्हणजे कोणताही आजार अथवा नर्व्हस सिस्टिम डिसॉर्डर नाही. रिसर्चनुसार, झोपताना असा झटका जाणवणे अत्यंत सामान्य आहे. साधारणतः ६० ते ७० टक्के व्यक्तींना असा अनुभव येतो.

(वाचा – H3N2 Virus इन्फ्लुएन्झाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, मुलांमध्ये दिसली अशी लक्षणे तर सावध व्हा)

Hypnic Jerk मागील कारणे

hypnic-jerk-

हायप्निक जर्कमागील अनेक कारणे शास्त्रज्ञ सांगतात. मात्र याचे मुख्य कारण सध्याच्या जगात चिंता आणि नैराश्य सांगण्यात येते. याशिवाय मेंदूला आराम न देता रात्री अपरात्री काम करणे, टीव्ही वा मोबाईल पाहणं ही समस्या अधिक वाढीला नेत आहेत.

(वाचा – सतत जांभई येत असेल तर करू नका दुर्लक्ष, आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोका)

Hypnic Jerk ची अतिरिक्त कारणे

hypnic-jerk-
  • काही शास्त्रज्ञांच्या मते यामागे चिंता, थकवा अथवा अति प्रमाणात कॅफेनचे सेवन, झोपेची कमतरता ही कारणे सांगण्यात येतात
  • काही वेळा संध्याकाळच्या वेळात अधिक शारीरिक व्यायाम करण्यात आल्यास हायप्निक जर्कचे कारण ठरते
  • शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम अथवा लोहाची कमतरता
  • झोपताना मसल्समध्ये अचानक गोळा येणे
  • अनकम्फर्टेबल पोझिशनमध्ये झोपण्यामुळे. कारण यावेळी मेंदूचा अर्धा हिस्सा कार्यरत असतो
  • नर्व्हस सिस्टिम उत्तेजित करणारी औषधे घेतल्यामुळे
हेही वाचा :  Date Rape Drug अन् PM सुनक यांचं घर... ब्रिटनमध्ये नवा वाद; थेट राजीनाम्याची मागणी

(वाचा – डायबिटीससाठी मेथी दाणे ठरतात वरदान, सेवन करायचे असेल तर सर्वात सुरक्षित पद्धत घ्या जाणून )

Hypnic Jerk पासून कशी मिळवाल सुटका

hypnic-jerk-
  • रोज कमीत कमी ८ तास किमान झोप घ्यावी
  • झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करून शरीर रिलॅक्स करावे
  • झोपण्यापूर्वी ६ तास आधी व्यायाम करू नये
  • योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सेवन करा
  • लोहयुक्त पदार्थांचे सेवन करा
  • झोपण्यापूर्वी कॉफी, सोडा अशी पेये पिणे टाळा
  • तणावपूर्ण गोष्टी वेळीच संपविण्याचा प्रयत्न करा

अशी परिस्थिती झोपेत खूप वेळा येते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ही एक नॉर्मल गोष्ट असून झोपेच्या बाबतीत असे अनेकदा घडून येते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …