रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video

Viral Video Of Ravan : देशभरात दसरा (Dasara Video) मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सोशल मीडियावर लोक दसऱ्याच्या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. कोण रामाचा अवतार घेतं, तर कोण रावणाचा (Ravan)… मात्र, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने (Viral Video) धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. रावणाने मरण्यापूर्वी आपली इच्छा पूर्ण केलीये. रामलीला कार्यक्रमात रावणाने कोणता पराक्रम केलाय? पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर रामलीलाचं (Ramleela) आयोजन करण्यात येत असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रावणाच्या भूमिकेत दिसतोय. खुल्या मैदानात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिला भाग झाल्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेण्यात आला होता. त्यावेळी रावणाने आपली तलप भागवली. रावणाने खिशातून गुडखा काढला अन् पाकीट फोडून गुटखा तोंडात (Ravan eating gutka) टाकला. 

रावणाची वेशभूषा केलेला व्यक्ती वेशातच गुटखा खाऊ लागला. त्यानंतर तिथं उपस्थित प्रेक्षकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला आहे. व्हायरल व्हिडिओ लखनऊ किंवा कानपूरचा असल्याचे सांगितले जातंय. हत्येच्या काही क्षण आधी, लंकापती, लंकेत बसून, मंत्रमुग्ध नर्तकांमध्ये शांतपणे रजनीगंधा खात होते, अशा मजेशीर कॅप्शनखाली Live_Gyan या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?

पाहा Video

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुटखा खाऊन या रावणानं स्वत:ला कलयुगातील रावण असल्याचं सिद्ध केलंय, असं एका युझरने म्हटलं आहे. तर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत. मात्र, हा व्हिडीओ पाहून तुम्हीला हसू फुटल्याशिवाय राहणार नाही.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …