सतत जांभई येत असेल तर करू नका दुर्लक्ष, आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोका

World Sleep Day: झोपेशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जांभई. सततची धावपळ, झोप पूर्ण न होणे, ऑफिस आणि कामामुळे येणारा तणाव, शरीराचा थकवा या सर्वच कारणांमुळे जांभई येते. काही ना काहीतरी कामं डोक्यात असल्यामुळे आपण आपल्या शरीराला आणि मनालाही आराम देत नाही. त्यामुळे आळस येऊन अथवा थकवा येऊन जांभई येते. पण हीच जांभई सतत लागोपाठ येत असेल आणि नेहमी असं होत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवे.

सतत जांभई येणे आरोग्याला घातही ठरू शकते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही जांभई अतिप्रमाणात येत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडून सल्ला घेण्याची गरज आहे. केवळ कंटाळा अथवा आळस आलाय म्हणून जांभई येत नाही तर आरोग्याला धोका असल्याचाच एक संकेतही आहे. शरीरामध्ये आजार वाढत असल्याचा जांभई हा मोठा संकेत आहे. याबाबत आम्ही फिजिशियन डॉ. अंजली पाठक यांच्याकडून मुद्दे समजून घेतले. (फोटो सौजन्य – iStock)

लिव्हर समस्या असणाऱ्यांना त्रास

लिव्हर समस्या असणाऱ्यांना त्रास

ज्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो आणि जांभई येण्याचा त्रास आहे त्यांना लिव्हर समस्याही असू शकते. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन लिव्हरची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सतत तुम्हाला जांभई येण्याचा त्रास होत असेल तर याबाबत दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा :  युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणेल गरम पाणी, कसे प्यावे योग्य पद्धत घ्या जाणून

फुफ्फुसाचे कार्य नीट नसल्यास

फुफ्फुसाचे कार्य नीट नसल्यास

तज्ज्ञांच्या मते हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे अथवा फुफ्फुसाचे कार्य नीट होत नसल्यास जांभई येण्याचे प्रमाण अधिक वाढते आणि तुम्हाला याबाबत अजिबात कळत नाही. जांभईच आहे असं म्हणून अनेक वेळा याकडे दुर्लक्ष होते. मात्र यामुळे तुम्हाला दम्याचा त्रासही होऊ शकतो हे लक्षात घ्या.

(वाचा – डायबिटीससाठी मेथी दाणे ठरतात वरदान, सेवन करायचे असेल तर सर्वात सुरक्षित पद्धत घ्या जाणून)

ब्रेन ट्युमरचे संकेत

ब्रेन ट्युमरचे संकेत

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, एका संशोधनानुसार, सतत जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही लक्षण आहे. असे संकेत मिळत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एपिलेप्सी, हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित त्रास, शरीराचे तापमान योग्य नसणे यामुळे जांभईचा त्रास उद्भवू शकतो.

(वाचा – प्रेग्नन्सीशिवाय स्तनांमधून दूध येणे खरंच धोकादायक आहे का? कोणत्या आजाराची धोक्याची घंटा, घ्या जाणून)

रक्तदाबाचाही त्रास

रक्तदाबाचाही त्रास

तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास जांभई अधिक प्रमाणात येते. सततच्या ताणतणाव आणि थकव्यामुळे हृदयाची धडधड कमी होते आणि त्यामुळे मेंदूला योग्य रक्तपुरवठा मिळत नाही. याच कारणाने मेंदूलाही थकवा येऊन जांभई येते.

हेही वाचा :  डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर

(वाचा – आलियाने जेवण न सोडता केले ६ महिन्यात २० किलो वजन कमी, ऋजुता दिवेकरचे डाएट)

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …