महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत विविध पदांची भरती, कोणतीही परीक्षा नाही; पगारही मिळेल चांगला

Pench Tiger Reserve Recruitment 2023: तुम्हाला प्राण्यांची आवड आहे का? जंगलात फिरायला तुम्हाला आवडत का? असं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण महाराष्ट्र वन विभागामार्फत विविध पदांची भरती करण्यात येत असून येथे दहावीपासून पदवीधरांना नोकरी मिळणार आहे. वन्यजीव, प्राणीशास्त्र, निसर्ग या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही येथे मन लावून काम करु शकाल. कायम तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करायला मिळेल. या पदभरतीचा सविस्तर तपशील जाणून घेऊया. 

महाराष्ट्र वन विभागाअंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यात एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी,  निसर्ग पर्यटन व्यवस्थापक,  सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, उपजीविका तज्ञ, सर्वेक्षण सहाय्यक, GIS तज्ञ,  ग्राफिक डिझायनर, सिव्हिल इंजिनियर, बचाव मदत टीम या पदांवर ही भरती केली जाणार आहे. 

जीवशास्त्रज्ञचे 1 पद भरले जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

हेही वाचा :  PM Kisan:कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा! e-KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख

पशुवैद्यकीय अधिकारीचे 1 पद भरले जाणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  60% गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अवन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) असणाऱ्या उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात येईल.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 50 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

निसर्ग पर्यटन व्यवस्थापकची  2 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 25 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापकची 2 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

उपजीविका तज्ञची 2 पदे भरली जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात / कृषी व्यवस्थापनात एमबीए असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 02 वर्षाचा अनुभव असाला. किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 05 वर्षाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

हेही वाचा :  कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

सर्वेक्षण सहाय्यकचे 1 पद भरले जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच टंकलेखन वेग इंग्रजी 40 शप्रमी, मराठी 30 शप्रमी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

GIS तज्ञचे 1 पद भरले जाणार आहे.  यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून विज्ञान पदवी किंवा भूगोल विषयात बी. ए. असणे आवश्यक आहे. यासोबतच जीआयएस विषयाचा कमीत कमी 03 वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

ग्राफिक डिझायनरचे 1 पद भरले जाणार असून उमेदवाराकडे पदवी असावी. तसेच ग्राफिक डिझायनिंगमध्ये पदवी किंवा पदविका असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

सिव्हिल इंजिनियरचे 1 पद भरले जाणार असून उमेदवार सिव्हिल इंजिनीअर पदवीधर असावा. या क्षेत्रातील 03 वर्षाचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये इतका पगार दिला जाईल. 

हेही वाचा :  ...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

बचाव मदत टीममध्ये 4 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्यांच्याकडे एमएचसीआयटीचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराकडे वन विभागात प्रत्यक्ष वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहीमेचा अनुभव असावा.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 10 हजार रुपये इतका पगार दिला जाईल.

यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मुलाखत होणार आहे. उमेदवारांना पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे उपस्थित राहावे लागणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …