भारतातील पहिला ट्रान्स पुरूषाचे बाळंतपण, केरळमधील ट्रान्सजेंडर कपलने दिली Good News

केरळचे ट्रान्सकपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी लवकरच चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आहे. दोघांनी याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. भारतातील ही पहिली ट्रान्स पुरूषाची डिलीव्हरी असल्याचा दावा केला जात आहे. महत्वाच म्हणजे मार्चमध्ये बाळ जन्माला येणार आहे. (फोटो सौजन्य – Ziya Paval इंस्टाग्राम)

भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समॅन

भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समॅन

असा दावा केला जात आहे की, भारतात बाळाला जन्म देणारा हा पहिला ट्रान्समॅन आहे. सर्जरी दरम्यान झाहदने स्तन काढून टाकले. मात्र त्याचे गर्भाशय आणि इतर काही शरीरातील अवयव काढले नाही. या कारणामुळे तो गरोदर राहिला असून गर्भधारणा अनुभवत आहे.

(वाचा – सत्यजित तांबे यांचं लेकीकडून कौतुक, बाप-लेकीचं नातं असावं तर असं)​

झियाची इंस्टाग्राम पोस्ट

झियाची इंस्टाग्राम पोस्ट

झियाने आपल्या बाळाची गोड बातमी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. मी जन्माने किंवा आपल्या शरीराने कधीच महिला नव्हती. मात्र माझ्या आतमध्ये एक स्त्री दडली आहे. माझं एक स्वप्न होतं की, माझं पण एक बाळ असेल, जे मला ‘आई’ म्हणून हाक मारेल.

हेही वाचा :  बॉयफ्रेंडच्या मोबईलवरील तो मेसेज वाचला अन् माझ्या अंगातून जीवच निघून गेला

(वाचा – ट्रान्सजेंडरने दिला बाळाला जन्म, स्वतः करतो ब्रेस्टफिडिंग, कसे झाले हे शक्य)

मुलं दत्तक घेण्याचाही केला होता विचार

मुलं दत्तक घेण्याचाही केला होता विचार

एका रिपोर्टनुसार, या कपलने एक मुल दत्तक घेण्याचाही केला होता विचार. मुलं दत्तक घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचाही विचार केला. मात्र त्यांच्यासमोर असंख्य समस्या होत्या. त्यातील मुख्य कारण म्हणजे ते एक ट्रान्सजेंडर कपल आहे. यामुळे त्यांनी स्वतःच आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला.

​ (वाचा – पायलट लेकीने वडिलांचा आशिर्वाद घेत उडवलं विमान, तरूणीच्या व्हिडीओने सगळ्यांचेच पाणावले डोळे)​

डॉक्टरांनी काय सांगितलं

डॉक्टरांनी काय सांगितलं

केरळचे ट्रान्सजेंडर कपल झिया आणि झाहाद यांनी सोशल मीडियावर गर्भधारणेची घोषणा केली आहे. कपलने इंस्टाग्रामवर पोस्टसोबत फोटो शेअर केले आहेत. कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेकरता कपलला कोणत्याही शारीरिक समस्येतून जावं लागलं नाही. या दोघांचीही लिंग परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होती तरी हे दोघं लवकरच पालकत्व अनुभवणार आहेत.

​(वाचा – तुमची डिलिव्हरी डेट जवळ आलीय? नॉर्मल प्रसूतीपेक्षा C-Section उत्तम पर्याय, जाणून घ्या यामागची कारणं)​

कसं देणार बाळाला दूध

कसं देणार बाळाला दूध

झिया आणि झाहाद हे कपल गेल्या ३ वर्षांपासून एकत्र आहेत. झिया पुरूषाच्या रुपात जन्माला आली पण ती आता एका महिलेच्या रुपात आहे. तर झाहद एका महिलेच्या रुपात जन्माला आला पण आता तो पुरूष आहे. ट्रान्स कपलने बाळाला मिल्क बँकमधून ब्रेस्ट मिल्क देण्याचा निश्चय केला आहे.

हेही वाचा :  डोक्याचा भुगा होईल! जगाच्या पाठीवरचं असं रहस्यमय ठिकाण; 20 हजार लोक गायब, दिशाहीन आवाज अन्...

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …