Crying makeup पासून Dark lip liner पर्यंत, हे 2022 मधील टॉप ब्युटी ट्रेंड

गतवर्षाची सुरुवात अगदी धुमधडाक्यात झाली. यावर्षात अनेक क्षेत्रात बदल झाले. ब्युटी क्षेत्रात देखील खूप बदल झाले आहेत. जगात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यांनी ट्रेंड सेट केला. हे केवळ मेकअप बद्दलच नाही, तर हेअर स्टाइल आणि लिप लाइनर यांसारख्या बर्‍याच गोष्टी दर्शवत आहेत. करोनानंतरच्या या काळात हॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेकांनी अनेक ट्रेंड सेट केले. चला तर मग या भन्नाट मेकअप ट्रेंडवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य : istock, Instagram)

​पासपोर्ट मेकअप

पासपोर्ट मेकअप नाव वाचून गोंधळून जाऊ नका, कारण हा मेकअप खूप सोपा आहे. ज्या पद्धतीने आपण पासपोर्ट फोटो काढतो ज्यामध्ये आपल्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसतात, हा पासपोर्ट मेकअप आहे. म्हणजेच असा मेक-अप करणे ज्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसतो. जॉर्जिया बॅरेटने यांनी हा मेकअप प्रसिद्ध केला.

​इनव्हिजिबल आयलायनर

इनव्हिजिबल आयलायनर, म्हणजेच असा आयलायनर मेकअप ज्यामध्ये तुम्ही आयलायनर लावल्यासारखे वाटत नाही. यासाठी आयलायनर पेनचा वापर केला जातो आणि तुम्हाला फक्त तुमच्या लॅश लाइनच्या जवळ एक पातळ रेषा काढायची आहे. यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे डोळे हायलाइट होतात. तुम्ही मेकअप केला आहे असं वाटतच नाही.

हेही वाचा :  "छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला"; भाजप आमदाराचा जावईशोध

​थकलेले डोळे

हा काहीसा विचित्र प्रकार आहे. यात थकल्यासारखे डोळे, मेकअपमध्ये डोळे गडद होतात. यामध्ये डोळे ठळक आणि डोळे थकलेले दिसतात. या दोन्ही गोष्टी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. (वाचा :- भाग्यश्री सारखे सुंदर दिसायचे असेल तर अशा प्रकारे मॉइश्चरायझर लावा, पन्नाशीनंतरही त्वचा चमकदार राहील)

​रडणारा मेकअप

रडून सुजलेला चेहरे आणि डोळे लपवण्यासाठी मेकअप करतात हे आपण ऐकलं असेल पण 2022 मध्ये ‘क्रायिंग गर्ल’ मेकअप ट्रेंड हिट झाला होता. ट्रेंडची सुरुवात Zoe Zoe Kim Kenealy च्या TikTok पासून झाली. यात लालसर मेकअप, अश्रू आणि सुजलेला लुक कसा मिळवायचा याबाबत सांगण्यात आले . रडण्याच्या मेकअपमध्ये, मेकअप अशा प्रकारे केला जातो की असे दिसते की व्यक्ती रडत आहे. या मेकअपमध्ये डोळे आणि नाकावर जास्त भर दिला जातो. (वाचा :- पार्लरमध्ये केसांना रंग करताना अचानक गळू लागले केस, डोक्याची झाली लाही लाही, कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवा )

असा करा रडका मेकअप

​गडद लिप लाइनर – गडद लिप लाइनर

गडद लिप लाइनर मेकअपमध्ये, लिपस्टिक हलकी ठेवली जाते आणि लिप लाइनर गडद केला जातो. अनेक अभिनेत्रींनीही त्यांच्या लुकमध्ये याचा समावेश केला आहे. या वर्षी हा ट्रेंड यावर्षांत खूपच चर्चेत होता. (वाचा :- Hair Fall: दररोज किती केस गळणे सामान्य आहे, डॉक्टरकडे कधी जावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सगळं काही )

हेही वाचा :  Viral Video: हुंड्यात सासरच्यांनी दिली होती ट्रेनची ऑफर; पण वराने नकार देण्याचं कारण ऐकून पोट धरून हसाल

​वेणी केशरचना

२०२२ मध्ये पोनीटेल हेअरस्टाइलही खूप प्रसिद्ध झाली. यामध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालून आपल्याल दिसल्या. (वाचा :- मेथीच्या दाण्यांपासून मिळवा घनदाट आणि लांब केस, लोक सुद्धा विचारू लागतील तुमच्या सुंदर केसांचे रहस्य)

​नो मेकअप मेकअप

No-makeup म्हणजे मेकअप नाही, म्हणजे असा मेकअप लावणे की मेकअप केलाच नाही असे वाटेल. या मेकअपमध्ये तुम्ही हलका आणि न्यूड मेकअप करून सुंदर दिसता. (वाचा :- या कडाक्याच्या थंडीतही सुंदर त्वचा हवी असेल तर ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले हे सोपे उपाय करुन पाहाच)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …