रोहितला राग अनावर! भुवीने कॅच सोडताच चेंडूला मारली लाथ; Video Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय कर्णधाराच्या या नव्या रुपाला पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत.

दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे भारताच्या अनेक क्षेत्रांतून कौतुक केले गेले. परंतु, ज्या प्रकारचं प्रदर्शन फील्डिंगमध्ये केले गेले त्यावर तो खूश दिसत नाही. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका जिंकली आहे पण टीम इंडियाचे कॅचिंग स्कील थोडे चांगले असावे अशी त्याची इच्छा आहे. कोलकत्ता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात, एका महत्त्वपूर्ण प्रसंगी काही झेल सुटले, ज्याबद्दल रोहित बोलत होता.

रोहितची प्रतिक्रिया

याआधी सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारने त्याच्याच चेंडूवर उंच झेल सोडला तेव्हा रोहितची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित शर्माच्या संतप्त प्रतिक्रियेने अनेक चाहत्यांच्या नजरेत तो आला. भुवनेश्वर कुमारने धुआंधार फलंदाजी करणाऱ्या रोमन पॉवेलचा एक सोपा झेल सोडला होता. हा सामन्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. झेल सोडल्यावर रोहित शर्माने हताश होऊन त्याच्या पायाने चेंडू एका बाजूला फेकला आणि त्यानंतर तो खूप रागावलेला दिसला. रोहितने पुढे चेंडू ढकलला तेव्हा विरोधी संघाला अतिरिक्त धाव मिळाली.

हेही वाचा :  मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : विसर्जन

(हे ही वाचा: मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद)

कधी घडली ही घटना?

ही घटना वेस्ट इंडिजच्या डावाच्या १६ व्या षटकात घडली जेव्हा निकोलस पूरन आणि पॉवेल यांनी आपापल्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजला १८७ धावांच्या लक्ष्यात जीवदान दिले. भुवनेश्वर कुमारने नंतर एक शॉर्ट लेन्थ बॉल टाकला जो पॉवेलने लाँग-ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला आदळला आणि हवेत उडला पण भारतीय गोलंदाज झेल सोडण्यात अपयशी ठरले.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

व्हिडीओ व्हायरल

रोहित शर्मा भुवनेश्वर कुमारजवळ उभा होता आणि त्याने रागाच्या भरात पायाने चेंडू पुढे ढकलला. भारतीय कर्णधारानेही ऋषभ पंतकडे निराशेने पाहिले. रोहित शर्मा बॉलला किक मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय कर्णधाराच्या या नव्या रुपाला पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत.

हेही वाचा :  माणुसकी काय असते 'या' चिंपांझीकडून शिका! माणसाने पाणी पिण्यास मदत केली म्हणून त्याने...

(हे ही वाचा: मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral)

(हे ही वाचा: कच्च्या रस्त्यावरून चालत असताना ट्रकचे झाले दोन तुकडे; थरारक घटनेचा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

चुका झाल्या म्हणून लीडरने अशी चीड दाखवू नये, असे चाहत्यांचे मत आहे. भुवनेश्वर कुमारने झेल सोडला असला तरी नंतर त्याने टाकलेले १९ वे षटक भारताच्या विजयाचे कारण ठरले. भुवनेश्वर कुमारने १९ षटकात केवळ ४ धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी २५ धावांची गरज होती. या शेवटच्या षटकात हर्षल पटेलमुळे भारताला ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवता आला.रोहित शर्माने सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …