VIRAL VIDEO : नातेच उठले जीवावर, संपत्तीच्या वादावरून भर रस्त्यात दोन कुटुंबांमध्ये लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी हाणामारी

पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. संपत्तीच्या वादावरून दोन कुटुंबातील सदस्यांनी भर रस्त्यात तुंबळ हाणामारी केलीय. इतकंच नव्हे तर तर लाथा, बुक्क्या आणि लाठ्यांनी तुफान मारहाण केली. जुन्या संपत्तीच्या वादातून ४ जणांनी २ जणांना बेदम मारहाण केली. भर रस्त्यात चार जण मिळून दुसऱ्या कुटुंबातील दोन लोकांना बेदम मारहाण करताना या व्हिडओमध्ये दिसून येत आहेत. अंगावर काटा आणणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

जगत (६२), हरेंद्र (४१), सुमित (२९) आणि अमित (२४) अशी चार आरोपींची नावे आहेत. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत जगतलाच अटक केली आहे. पोलिस उपायुक्त संजय सेन म्हणाले की, जगतने परिसरातील सर्वांना घाबरवण्यासाठी वकिलांचे आणि भाजपचे बनावट फलक दाखवले. हे प्रकरण भाजपचे अधिकारी आणि बार कौन्सिलकडे मांडले जाईल, असं सांगून दुसऱ्या कुटुंबाला घाबरवण्यात आलं होतं. या घटनेची माहिती देताना डीसीपी म्हणाले की, ही घटना ईशान्य दिल्लीतील न्यू उस्मानपूर येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली.

हेही वाचा :  Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

आणखी वाचा : KISS DAY 2022 : ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंदापर्यंत ‘किस’ करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा VIRAL VIDEO

पोलिस उपायुक्त संजय सेन यांनी पुढे बोलताना सांगितले की, हल्ल्याबाबत पीसीआर कॉल होता, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की आरोपी दोन लोकांना बेदम मारहाण करत आहे. “परिस्थिती नियंत्रणात आली असून जखमींना जग प्रवेश चंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना गुरु तेग बहादूर रुग्णालयात हलवण्यात आले. एका व्हिडीओमध्ये, दोन लोकांना दिवसा ढवळ्या अनेक लोक मारहाण करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : बसमध्ये घुसून महिलेनं ड्रायव्हरला केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कोयना अभयारण्यातील शिवसागर जलाशयात सांबराची स्विमिंग पाहून पर्यटक आश्चर्यचकीत, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा :  धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या विकृताला अटक

पोलिस उपायुक्त संजय सेन यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, दोन्ही पक्षांमध्ये जुन्या संपत्तीवरून वाद सुरू होते आणि यापूर्वीही क्रॉस केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. आरोपींनी परिसरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे, असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …