भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ (IND vs WI) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. आज तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना रंगणार आहे. दोन्ही संघात टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंची भरणा आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा अतिशय रंजक होण्याची अपेक्षा आहे. आज भारताचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला अगदी सहज विजय मिळाला असला तरी टी-२० मध्ये विंडीज संघ चांगले आव्हान देऊ शकतो. हे आव्हान पेलण्यासाठी भारतीय संघाकडे एकापेक्षा जास्त खेळाडू आहेत. टीम इंडियाकडे विशेषत: गोलंदाजीत बरेच पर्याय आहेत. आज फिरकीपटू रवी बिश्नोई भारताकडून पदार्पणाचा सामना खेळत आहे.
हेड-टू-हेड आकडेवारी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ६ टी-२० मालिका झाल्या आहेत, त्यापैकी भारतीय संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. शेवटच्या वेळी २०१९मध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये भारताने २-१ ने विजय मिळवला होता. वेस्ट इंडीजने २०१७मध्ये घरच्या मैदानावर मालिका जिंकली होती.
हेही वाचा – IND vs WI : “तुम्ही गप्प बसाल तर…”, विराटबाबत मत देताना रोहित शर्मा भडकला!
दोन्ही संघांची Playing 11
भारत : इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, यजुर्वेंद्र चहल.
वेस्ट इंडीजः ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन ( यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, कायरान पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन एलन, शेल्डन कॉट्रेल.
The post IND vs WI 1st T20 : रोहित शर्मानं जिंकला टॉस; भारताकडून युवा खेळाडूचं पदार्पण! appeared first on Loksatta.