Weight Loss: रोज अर्धा तास व्यायाम की १० हजार पावलं चालणे काय योग्य

वजन नियंत्रित राखण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणारी अधिक लोकं दिसून येतात. तर हल्ली अधिकाधिक व्यक्ती १० हजार स्टेप्स पूर्ण करण्याचे ध्येय ठेवतात. त्यासाठी स्मार्ट वॉचचा वापरही अधिक प्रमाणात होताना दिसून येतोय. पण या दोन्हीपैकी कोणता पर्याय अधिक योग्य आहे?

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आरोग्य अधिक चांगले राखण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आठवड्यातून किमान १५० मिनिट्स व्यायाम करावा. ५ दिवसातून किमान रोज ३० मिनिट्स व्यायाम करण्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. डॉ. माधव भागवत यांच्याकडून आम्ही चर्चा करून अधिक माहिती घेतली. (फोटो सौजन्य – iStock)

वजन कमी करण्यासाठी काय योग्य?

वजन कमी करण्यासाठी काय योग्य?

व्यायाम करण्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची गरज भासते. पण तुमच्याकडे रोज सकाळी व्यायाम करण्याइतका वेळ नसेल तर रोज १०,००० पावलं चालण्याचे ध्येय ठेवा आणि ते ध्येय पूर्ण करा. शारीरिकदृष्ट्या नियमित स्वरूपात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करणे योग्य ठरते. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पर्याय नियमितपणे करणे योग्य ठरते.

हेही वाचा :  तीन महिन्यांत पोट कमी करा नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना अल्टीमेटम

रोज १० हजार पावलाचे ध्येय

रोज १० हजार पावलाचे ध्येय

एका दिवसात १० हजार पावले चालणे हे अत्यंत सोपे ध्येय आहे. स्टेशनपासून ऑफिस अथवा घरापासून स्टेशन, कुत्र्याला फिरायला घेऊन जाणे, मुलांसह पाय मोकळे करायला जाणे या सगळ्या गोष्टींमधून हे ध्येय साध्य करणे सोपे जाते.

(वाचा – Heart Blockage: बायपास सर्जरीशिवायही हार्ट ब्लॉकेजची समस्या होईल दूर, बाबा रामदेवने सांगितले ४ उपाय)

१० हजार स्टेप्स पूर्ण करण्याचे फायदे

१० हजार स्टेप्स पूर्ण करण्याचे फायदे

रोज १० हजार पावलं पूर्ण करण्याचे फायदे केवळ वजन कमी करण्यासाठीच होत नाहीत. तर तुमच्या भावनांवर भर देत तुम्हाला प्रेरित करण्याचे कामही हा व्यायाम करतो. तसंच तुमच्या सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठीही मदत मिळते. डायबिटीससारखा आजार असल्यास नियंत्रित ठेवण्यासाठीही रोज चालण्याने फायदा मिळतो. ३० मिनिट्स व्यायाम आणि १० हजार पावले या दोन्ही व्यायामांमुळे तितक्याच कॅलरी जाळल्या जातात असं म्हटलं जातं. पण नक्की तथ्य काय हे जाणून घेऊया.

(वाचा – या खास चटणीने करा युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर, आहारात करून घ्या समाविष्ट)

व्यायाम आणि १० हजार स्टेप्समधील फरक

व्यायाम आणि १० हजार स्टेप्समधील फरक

व्यायाम अथवा पायी चालणं या दोन्ही कार्डिओव्हॅस्क्युलर सहनशक्ती सुधारणा करणाऱ्या प्रक्रिया आहेत. अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. ज्या व्यक्तींना डायबिटीस अथवा अन्य आजार आहेत त्यांनी १० हजार पावलं पूर्ण करण्यासाठी वेगाने चालावे. तर सक्रिय जीवनशैली असणाऱ्या व्यक्ती अर्थात बायकर्स, एथलिट्स यांच्यासाठी वर्काआऊटची गरज भासते.

हेही वाचा :  मर्यादा ओलांडली तरीही सुप्रीम कोर्टात कसं टिकेल मराठा आरक्षण? मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर!

(वाचा – भाजलेल्या त्वचेवर करता येतील स्टेम सेल्सद्वारे उपचार, त्वचा दिसणार नाही खराब)

व्यायाम की १० हजार स्टेप्स

व्यायाम की १० हजार स्टेप्स

चालणे आणि व्यायाम करणे या दोन्ही पद्धती योग्यच आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, चालणे आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी निवडू शकता. व्यायाम करताना स्ट्रेचिंग एक दिवस आणि आरामासाठी एक दिवस ठेऊ शकता. तर रोज १० हजार पावलं चालण्याने पाय दुखत नाहीत. त्यामुळे सहसा १० हजार स्टेप्सचा जास्त उपयोग होताना दिसून येत आहे.

शरीर स्वास्थ्य राखण्यासाठी या दोन्ही पर्यायांपैकी तुम्ही १ पर्याय निवडू शकता. मात्र त्याचा नियमित वापर करून घेतल्यास, वजन कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो हे लक्षात घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …