टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा भयंकर कॅन्सर

बहुतेक Cancers हे सायलेंट किलर म्हणून ओळखले जातात. म्हणजेच यामध्ये कर्करोग झाला असल्याचे अजिबात समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे कर्करोग आतल्या आत खूप घातक ठरतात. कोलोरेक्टल हा देखील असाच एक कॅन्सर आहे, ज्यामध्ये सुरुवातीला लक्षणे दिसण्याची शक्यता फारच कमी असते. पण टॉयलेटवेळी दिसणार्‍या या 6 बदलांकडे लक्ष देऊन तुम्ही हा कर्करोग झाल्याचे ओळखू शकता. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कोलोरेक्टल कॅन्सर आहे तरी काय?

तर मंडळी, दोन अवयवांवर परिणाम करणाऱ्या कर्करोगाला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतात. याचा अर्थ तुमच्या मोठ्या आतड्यात किंवा मलाशयात कॅन्सरच्या पेशी वाढत आहेत. आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदा या कर्करोगाबद्दल ऐकत असतील, पण जगात हा कर्करोग एक गंभीर आजार म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या आजाराबाबत जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी मार्च हा महिना कोलोरेक्टल कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  चेहऱ्यावरील बारीक केस काढण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत, काही सेकंदात नको असणारे केस छुमंतर

शौच करताना वेदना होतात

शौच करताना वेदना होतात

Spandana Oncology Centre and HCG Bangalore चे सीनियर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट Dr. Satheesh CT यांच्या मते, हे कोलोरेक्टल कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण आहे, ज्याकडे अनेकदा पोटाची समस्या म्हणून पाहिले जाते व दुर्लक्ष केले जाते. काही रुग्णांना या स्थितीत पोटदुखी किंवा पोटात गोळे देखील येऊ शकतात. त्यामागचे कारण म्हणजे मोठ्या आतड्यात अडथळा निर्माण होणे आणि शौच बाहेर येण्यासाठी मार्ग न सापडणे.

(वाचा :- Rapper Badshah Weight Loss रॅपर-गायक बादशाहला या 4 समस्यांमुळे करावं लागलं वेटलॉस, या आजारात थांबतो थेट श्वासच)​

मलत्याग करताना रक्त पडणे

मलत्याग करताना रक्त पडणे

कोलोरेक्टल कर्करोगाचे हे लक्षण देखील बद्धकोष्ठता किंवा मुळव्याधाचे लक्षण समजून दुर्लक्षित केले जाते. किंवा अनेकजण मुळव्याध वा बद्धकोष्ठतेचे उपचार करायला सुरूवात करतात. कोलोरेक्टल कर्करोगामध्ये रक्तस्त्राव वारंवार होतो आणि कालांतराने तो अधिक तीव्र होऊ शकतो. पण बद्धकोष्ठतेचा रक्तस्त्राव सतत होत नाही.
(वाचा :- H3N2 Virus चिंता वाढली, करोनानंतर एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू,झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं)​

जुलाब

जुलाब

डॉक्टरांच्या मते, कधीकधी या कॅन्सरमुळे मल त्यागण्याच्या सवयीमध्ये फरक पडतो किंवा मल किती जाड वा पातळ आहे त्यामध्ये सुद्धा फरक पडतो. कारण, मोठ्या आतड्यात असलेल्या ट्यूमरमधून पू सारखा द्रव बाहेर पडतो, ज्यामुळे डायरिया अर्थात जुलाब होऊ शकतात. अनेक प्रकरणांमध्ये डायरियाची ही समस्या गंभीर देखील असू शकते.
(वाचा :- Men Yoga : जे पुरूष स्मोक-ड्रिंक करतात पण बाबा होण्यात अडचण नकोय अशांसाठी जबरदस्त उपाय, दिवसातून काढा 2 मिनिटं)​

हेही वाचा :  या ३ सवयींमुळे वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास, डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय ज्यामुळे मुळापासून त्रास होईल नष्ट

बद्धकोष्ठता आणि शौचास पातळ होणे

बद्धकोष्ठता आणि शौचास पातळ होणे

कोलोरेक्टल कॅन्सरच्या सुरूवातीला बद्धकोष्ठता हीच प्रमुख समस्या असू शकते. कारण ट्यूमरमुळे आतड्यात अडथळा येतो आणि शौच बाहेर येऊ शकत नाही. याशिवाय या अडथळ्यामुळे शौचास सैल होऊ शकते. शौचास गेल्यावर दिसणारे हे 2 बदल देखील या प्राणघातक कर्करोगाचे संकेत देऊ शकतात.
(वाचा :- 94 किलोच्या या मुलाने ही साधीसोपी घरगुती ट्रिक वापरून घटवलं तबब्ल 25 किलो वजन,दिसू लागला हिरोप्रमाणे Slim-Trim)​

बाथरूमला जाऊन आल्यानंतरही वाटते बैचेनी

बाथरूमला जाऊन आल्यानंतरही वाटते बैचेनी

जेव्हा ट्यूमर आतड्यात अडथळा निर्माण करतो, तेव्हा शौच करताना किंवा शौचास जाऊन आल्यानंतरही सतत असे वाटत राहते की पोट पूर्णपणे साफ झाले नाही. त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आणि बैचेनी जाणवते.

(वाचा :- जेवताना ही 2 कामं करणा-यांचं पोट कधीच होत नाही साफ व पचनक्रियेचे वाजतात 12, या 8 नियमांची घ्या कटाक्षाने काळजी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …