या ३ सवयींमुळे वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास, डॉक्टरांनी सांगितला घरगुती उपाय ज्यामुळे मुळापासून त्रास होईल नष्ट

थंडीत सर्दी-खोकला, ताप यांसारखे आजार वाढतात. पण थंडीतही बद्धकोष्ठता गंभीर होते हे फार कमी लोकांना माहिती आहे. बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे, यावर उपचार न केल्यास मूळव्याध आणि फिशरसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. चला जाणून घेऊया थंडीत बद्धकोष्ठता का वाढते आणि ती दूर करण्यासाठी काय खावे.

बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे लक्षण? जेव्हा पोट साफ नसेल किंवा खूप त्रासाला सामोरे जावे लागते तेव्हा समजावे की बद्धकोष्ठता झाली आहे. बद्धकोष्ठतेच्या आत, पोट साफ करण्यासाठी दाब द्यावा लागतो आणि मल जड होतो. जर तुम्हाला अशी समस्या दिसत असेल तर बद्धकोष्ठतेसाठी घरगुती उपायांचा अवलंब करा. (फोटो सौजन्य – istock)

​थंडीत का वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास?

NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे सूचित होते की जेव्हा थंड असते तेव्हा चयापचय मंदावतो. त्याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो आणि ती कमजोर होते. या कारणांमुळे आतड्यांमधून मल सहज निघत नाही आणि बद्धकोष्ठता सुरू होते.

हेही वाचा :  आतड्यांना पिळवटून टाकणाऱ्या मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय, ऑपरेशनशिवाय व्हाल बरे

​थंडीत या ३ सवयींमुळे वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास?

  • पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होते
  • चहा-कॉफी-अल्कोहोलचे अतिसेवन
  • जास्त भूक लागल्याने तळलेले अन्न खाणे

Ayurveda Dr कडून जाणून घ्या बद्धकोष्ठतेचा उपाय

​बद्धकोष्ठतेवर पपई हा रामबाण उपाय

आतडे उघडण्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये मल मऊ करणारे गुणधर्म आहेत, ज्यामुळे बद्धकोष्ठता उघडते. बद्धकोष्ठतेमध्ये रोज पपईचे सेवन करावे.

​मनुकाने तोडला बद्धकोष्ठतेचा त्रास

आयुर्वेद डॉक्टर मिहिर खत्रीने बद्धकोष्ठतेवार उपचार मनुके खायला सांगितले. दररोज १० ते १५ मनुके रात्री एका भांड्यात पाण्यात भिजवा. सकाळी उठून ते खाल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

​भाज्यांचा सूप हा घरगुती उपाय फायदेशीर

भाज्यांचा सूप पिऊन तुम्ही बद्धकोष्ठतेवर उपाय करू शकता. आयुर्वेद डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या जेवणात एक वाटी भाज्यांचा सूप पिऊन तुम्ही मेटाबॉलिज्म आणि पचण्यास सोप होते. ज्यामुळे सकाळी पोट देखील चांगल साफ होतं.

​झोपण्याअगोदर दूधात तूप टाकून प्या

दूध आणि तूप यांच्यामुळे बद्धकोष्ठता आणि फिशरचा त्रास कमी होतो. रात्री १ कप दूधात १ चमचा देसी गाईचे तूप प्या. जेणेकरून तुमच्या आतड्या आतून साफ ओलसर होऊन साफ होतील. यामुळे सकाळच्या विधीला त्रास होत नाही.

हेही वाचा :  टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा भयंकर कॅन्सर

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …