Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 

जाणून घ्या ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चं कलेक्शन (Avatar The Way Of Water Collection) : 

‘अवतार’ हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 13 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागाप्रमाणे अवतारचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतात या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 40.3 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 42.5 कोटी, तिसऱ्या दिवशी 46 कोटी तर चौथ्या दिवशी 18.50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 147.30 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

  • पहिला दिवस – 40.3 कोटी
  • दुसरा दिवस – 42.5 कोटी
  • तिसरा दिवस – 46 कोटी
  • चौथा दिवस – 18.50 कोटी
  • एकूण – 147.30 कोटी

जगभरात ‘अवतार 2’चा बोलबाला (Avatar 2) : 

‘अवतार 2’ची घौडदौड पाहता हा सिनेमा लवकरच 250 कोटींचा टप्पा पार करणार आहे. अवतारच्या पहिल्या भागाने रिलीजच्या काही दिवसांत 109 कोटींची कमाई केली होती. तर आता दुसऱ्या भागाने तीनच दिवसांत हा रेकॉर्ड मोडला आहे. आतापर्यंत जगभरात या सिनेमाने 3500 कोटींची कमाई केली आहे. 


सिनेप्रेमी सध्या अवतारच्या दुसऱ्या भागाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा हॉलिवूडचा या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरू शकतो. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 

संबंधित बातम्या

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ची तीन दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; जाणून घ्या आतापर्यंतचं कलेक्शन…



Source link

हेही वाचा :  अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं शेअर केला खास व्हिडीओ

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …