देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे. 

आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा  पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत. विमा नियामक IRDAI ने आरोग्य विमा विकणाऱ्या कंपन्यांना तसेच निर्देश दिले आहेत. आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी ग्राहक माहिती पत्रक (CIS) ग्राहकांना समजावे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी, शर्थी सोप्या भाषेत असाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कठीण शब्द प्रयोगामुळे ग्राहकांना पॉलिसी समजत नाही, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.

काय आहेत निर्देश

विमा कंपन्यांनी पॉलिसीत दिलेल्या  (आरोग्य विमा पॉलिसी) अटी ग्राहकांना सहज समजू शकतील, अशा लिहाव्यात, असे नियामकाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. पॉलिसीधारकाने खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अटी आणि नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे. पॉलिसी दस्तऐवज कायदेशीर गुंतागुंतांनी भरलेला असल्याने, पॉलिसीची मूलभूत वैशिष्ट्ये होणे आवश्यक असते. 

हेही वाचा :  अब्दुल सत्तारांची आमदाराकीच धोक्यात? गुन्हा दाखल झाल्याने अडचण वाढली

विमा कंपन्या आणि पॉलिसीधारक यांच्यात माहितीची स्पष्ट सांगितली जात नाही, अशा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर IRDAI हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे नवीन CIS स्वरूप 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. नवीन फॉरमॅट लागू करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत.

विमा कंपन्या, मध्यस्थ आणि एजंट यांनी पॉलिसीची कागदपत्रांचे स्पष्ट भाषेत आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. सर्व पॉलिसीधारकांना पॉलिसीची प्रिंट किंवा डिजिटल कॉपी दिली जाईल.

पॉलिसीधारकाची इच्छा असल्यास, त्यांच्या स्थानिक भाषेत CIS प्रदान केले जावे.

CIS वर फॉन्ट आकार किमान 12 (एरियल) किंवा मोठा असणे आवश्यक आहे.
ग्राहक माहिती पत्रक (CIS) मधील सर्व फील्ड पूर्ण करणे आवश्यक आहे.
पॉलिसी दस्तऐवजाच्या फॉरवर्डिंग लेटरमध्ये CIS चा संदर्भ द्यावा.
आरोग्य विमा कंपन्यांनी पॉलिसीधारकाला CIS मिळेल याची खात्री करावी.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …