वेबसाईट्सच्या नजरेपासून असा सुरक्षित ठेवा पर्सनल डेटा, बदला या सेटिंग्स, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Website Track Data: ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यापासून ते बँकेच्या कामांपर्यंत, शिक्षणापासून ते ऑफिसपर्यंत आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहावे लागते. पण, वाढत्या वापरामुळे युजर्ससाठी धोकाही वाढला आहे. इंटरनेटवर एखादे करण्यासाठी तुम्ही जेव्हा कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा ती साइट तुमच्या वैयक्तिक डेटावर देखील लक्ष ठेवते. वेबसाइटला भेट दिली असता अनेकदा अनवधानाने युजर्स त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करतात.

वाचा: एलन मस्कची ट्विटरमध्ये एन्ट्री, कामाचे प्रेशर वाढले, ऑफिसमध्येच झोपत आहेत कर्मचारी

वेबसाइटला वैयक्तिक डेटा पाहण्यापासून ब्लॉक करा:

संगणक, लॅपटॉप किंवा मोबाइलवर ब्राउझर वापरून युजर्स वेबसाइटला वैयक्तिक डेटा पाहण्यापासून ब्लॉक करू शकतात. यासाठी तुम्हाला डोन्ट ट्रॅक रिक्वेस्ट पाठवावी लागेल. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ते एनेबल करावे लागेल. या स्टेप्स फॉलो करून रिक्वेस्ट पाठवता येईल.

वाचा: OnePlus चा ‘हा’ सुपरहिट स्मार्टफोन स्वस्तात होईल तुमचा, विशेष ऑफरमध्ये मिळतोय १४,००० रुपयांपर्यंतचा फायदा

PC किंवा लॅपटॉप युजर्ससाठी:

Google Chrome वेब ब्राउझर उघडा. आता थ्री पॉइंट पर्यायावर जा. तुम्हाला ते स्क्रीनच्या अगदी उजव्या बाजूला दिसेल. एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल. येथून सेटिंग्ज पर्याय निवडा. आता “गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज” पर्याय शोधा आणि “कुकीज आणि इतर साइट डेटा” वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या ब्राउझिंग ट्रॅफिकसह “डो नॉट ट्रॅक” रिक्वेस्ट पाठवा सह ते चालू किंवा बंद करू शकता.

Android युजर्ससाठी :

हेही वाचा :  'हात दाखवा, गाडी थांबवा' तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे पुणेकरच...'

फोनवर Google Chrome वेब ब्राउझर उघडा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला असलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करा. आता Settings पर्याय निवडा.
मेनू सूचीमधून “गोपनीयता आणि सुरक्षा सेटिंग्ज” पर्याय शोधा आणि निवडा. आता “Do Not Track” पर्यायावर क्लिक करा आणि सेटिंग चालू करा.

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, डू नॉट ट्रॅक चालू केल्यानंतरही काही वेबसाइट तुमच्या वैयक्तिक डेटावर लक्ष ठेवू शकतात. Google च्या हेल्प सेंटर पेज नुसार, वेबसाइट सुरक्षितता सुधारण्यासाठी कन्टेन्ट, सेवा, जाहिराती आणि सूचना इत्यादी प्रदान करण्यासाठी तुमचा ब्राउझिंग डेटा वापरू शकतात. डू नॉट ट्रॅक विनंत्या प्राप्त होऊनही Google सह बर्‍याच वेबसाइट्स असे करणे सुरू ठेवू शकतात.

वाचा: Spy Camera: हिडन कॅमेराची तुमच्यावर नजर तर नाही ? या Apps च्या मदतीने करा माहित

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …