OYO संस्थापक ते शार्क टँकचे जज; Ritesh Agarwal यांच्या ‘या’ गोष्टी माहितीये का?

Ritesh Agarwal Success story : टेलिव्हजन सेटवरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणून ‘शार्क टँक’ उदयाला आला आहे. अनेक बिझनेस आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यात शार्क टँकला (Shark Tank India 3) यश आलंय. अशाचत आता शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता  यावेळी सर्व जजेससोबत एका नव्या जजची म्हणजेच नव्या शार्कची एन्ट्री होणार आहे. यातील एका नावाने सर्वांना चकित केलंय. कारण यावेळी ओयोचे (OYO Founder) संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यावेळी शार्क म्हणून शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत.

तिसऱ्या सीझनमध्ये (Shark Tank India 3) अनुपम, विनीता, पीयूषसोबत रितेश अग्रवाल देखील दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रितेश अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावेळी त्यांनी गोड बातमी दिली. “जेव्हा मी माझा उद्योजकीय प्रवास सुरू केला तेव्हा संसाधने मिळणx कठीण होते. इकोसिस्टम म्हणजे मार्गदर्शक, कुलगुरू आणि इतर संस्थापक खूप उदार आणि दयाळू होते, ज्यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे माझा प्रवास सोपा आणि समाधानकारक झाला.”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जेव्हा जेव्हा मला उद्योजकांशी संपर्क साधण्याची, त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्या वैयक्तिक प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देण्याची संधी मिळते तेव्हा मला खूप आनंद होतो, असं रितेश अग्रवाल म्हणतात. त्यामुळे चाहत्यांची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, रितेश अग्रवाल यांच्या यशस्वी वाटचाली बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

हेही वाचा :  महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित

रितेश अग्रवाल हे ओडिशाच्या दक्षिणेस असलेल्या बिस्समकटक या छोट्याशा गावचे आहेत. बिस्समकटक हा भाग नक्षलग्रस्त मानला जातो. स्वतःचा व्यवसाय करायचा होता त्यामुळे काही विचार न करता रितेश रस्त्यावर फिरून सिमकार्ड विकू लागला. 2009 साली रितेशला ट्रेकिंगला जाण्याची संधी मिळाली. मात्र, त्यावेळी खोल्यांची व्यवस्था पाहून त्यांना अनोखी कल्पना सुचली. रितेशने 2012 मध्ये Oreval Stays नावाची ऑनलाइन रूम बुकिंग कंपनी सुरू केली होती. त्यावेळी ही कल्पना ऐकून उद्योजक मनीष सिन्हा यांनी या कंपनीत गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2013 मध्ये रितेशने या कंपनीचे नाव बदलून ओयो रूम्स असं केलं.

Indian Railways : मध्य रेल्वेने प्रवास करताय? थांबा… ‘या’ पाच दिवसांसाठी असणार ब्लॉक

कंपनी सुरू करण्याआधी रितेश यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.  अनेक चढउतार पहावे लागले. दररोजच्या वेगळ्या समस्या त्यामुळे सर्वत्र लक्ष देता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी स्वत:ची टीम बिल्डअप केली. स्त्यावर सिमकार्ड विकणाऱ्या मुलाचा आज जगातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत समावेश झालाय. जगातील 80 देशांतील 800 शहरांमध्ये त्यांचा व्यवसाय विस्तारला गेलाय. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मानक खोल्या अन् जोडप्यासाठी अनुकूल पर्याय उपलब्ध करून देणं, ही दोन ध्येय कंपनीने पाळलं अन् आज कंपनीने मोठं यश मिळवलंय.

हेही वाचा :  Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …