Remedies For Hair Growth : 1 महिन्यात 4 ते 6 इंचाने लांबसडक व घनदाट होतील केस, 60ठी नंतरही गळणार नाहीत, करा ‘हे’ उपाय!

काही लोक केसांच्या वाढीबद्दल खूप चिंतीत असतात. तेल लावल्यानंतर आणि विविध केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यानंतरही केसांची लांबी सारखीच राहते. इतकेच नाही तर शारीरिक समस्यांचा परिणाम तुमच्या केसांवरही दिसून येतो. म्हणूनच तज्ञ नेहमी निरोगी गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. तथापि, केस गळण्याची इतरही अनेक कारणे आहेत. खराब झालेले केस हे देखील याचे एक कारण असू शकते, कारण त्यामुळे केसांना फाटे फुटतात व ते दुतोंडी बनतात ज्यामुळे केस मुळापासून तुटू लागतात. लांब केस कोणाला नको असतात? सगळ्यांनाच हवे असतात. पण ते मिळवण्यासाठी मेहनत सुद्धा तितकीच घ्यावी लागते. असे काही खास उपाय आहेत जे वापरले तर तुम्ही सहज तुमचे केस वाढवू शकता.

पण होतं काय की आपल्याला कोणते उपाय वापरायचे, कोणते नाही वापरायचे याचे योग्य ज्ञान आणि माहिती नसते त्यामुळे अनेकदा नको त्या उपायांवर आपला वेळ खर्च होऊन बसतो. तुम्हाला सुद्धा अस अनुभव आला असेलच की तुम्ही अनेक उपाय करून पहिले पण त्याचा तुमच्या केसांवर परिणामच झाला नाही. पण आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज काही खास उपाय सांगणार आहोत जे तुमचे केस घनदाट आणि लांब करायला मदत करतील. अजून एकदा ट्राय करून पहा आणि हे उपाय नक्की वापरा, तुम्हाला फरक दिसणारच! (फोटो साभार : freepik)

इसेंशीयल ऑईल

सध्या इसेंशीयल ऑईलचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांची खूप जास्त चलती सुद्धा आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की याचा वापर केवळ केसांसाठीच नाही तर स्किनसाठी सुद्धा केला जातो. खास गोष्ट ही आहे की यामुळे केसांचे लयाला गेलेले सौंदर्य सुद्धा परत मिळते. रोजमेरी आणि लेव्हेंडर हेअर ग्रोथ साठी परफेक्ट समजले जातात. पण तुम्ही तुमच्या पसंतीने कोणतेही इसेंशीयल ऑईल वापरू शकता. ऑईलिंग किंवा हेअर पॅकमध्ये या इसेंशीयल ऑईलचे 4 ते 5 थेंब मिक्स करा आणि अप्लाय करा तुम्हाला स्वत:लाच फरक दिसून येईल. (फोटो साभार: pexels)

हेही वाचा :  Viral: 'या' प्राण्याच्या स्पर्ममधून मालक कमावतो लाखो रूपये?

(वाचा :- Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला ‘हा’ उपाय..!)

ऐलोवेरा जेलचा वापर

केसांसाठी ऐलोवेरा खूप फायदेशीर समजले जाते. याचा गर किंवा जेल देखील तितकाच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही हे जेल स्कॅल्पवर लावून केवळ 30 मिनिटे ठेवायचं आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता. महिनाभर सतत अप्लाय केले तर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळेल. पण प्रिझर्व्ह केलेल्या ऐलोवेरा जेलचा सहसा वापर करू नका. घरच्या ताज्या व नैसर्गिक कोरफडीच्या पानांतून काढलेला गर वापरणं किंवा घरच्या घरीच ऐलोवेरा जेल बनवून त्याचा वापर करणे उत्तम! (फोटो साभार: pixabay&istock)

(वाचा :- Amla Uses For Skin : 50 शीत दिसायचं आहे 20 शी सारखं तरूण? मग फक्त 10 रूपयांच्या ‘या’ गोष्टीचा असा करा वापरा..!)

कांद्याचा हेअर पॅक

कांद्याचा ताजा रस केसांसाठी खूप फायदेशीर असतो आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा ठावूक असेलच. कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात. तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा आणि 45 मिनिटांनी केस धुवून घ्या. (फोटो साभार: pexels)

हेही वाचा :  प्रेग्नन्सीदरम्यान जास्त तूप खाणे धोकादायक? किती प्रमाणात करावे सेवन

(वाचा :- Betel Leaf for skin care : एका रात्रीत पिंपल्स बरे करू शकतं ‘हे’ एक पान, चेहरा ग्लोइंग बनवण्यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर आहे रामबाण..!)

राईस वॉटर

राईस वॉटरचा वापर तुमच्यापैकी अनेकांनी या आधी सुद्धा केला असेल आणि हेअर ग्रोथ साठी राईस वॉटर हे खरंच उपयुक्त आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अप्लाय करूनच तुम्हाला महिन्याभरात खूप जास्त फरक दिसून येतो. राईस वॉटर बनवण्यासाठी आधी तांदूळ शिजवून घ्या. पाणी यात जरा जास्तच ठेवा कारण तेच तुम्हाला हवे आहे. आता कपड्याच्या मदतीने हे पाणी गाळून घ्या. नंतर स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवा. थंड झाल्यावर स्प्रे बॉटलच्या मदतीने स्कॅल्पवर लावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी अप्लाय करा. 45 मिनिटे असेच ठेवल्यावर शॅम्पूने हेअर वॉश करा. (फोटो साभार: freepik)

(वाचा :- Food For Hair Fall : वयाच्या 60ठी नंतरही केस राहतील घनदाट व लांबसडक, हेअरफॉलही होईल बंद, करा हेअर एक्सपर्ट्सचे हे उपाय!)

तुळशीचे पाणी

तुळशीच्या पानांचे पाणी सुद्धा केसांसाठी चांगले असते. काही लोकांसाठी तर हे एका जादूसारखे काम करते. जर तुमच्याकडे हेअर पॅक लावण्याचा वेळ नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करा. यासाठी एक भांड्यात 3 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवून द्या. आता यात तुळशीचे 20 ते 25 पाने मिक्स करा. उकळवून घ्या, जेणेकरून त्यातील रस पाण्यात मिक्स होईल. आता जेव्हा हे उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी सोडून द्या. आता शॅम्पू केल्यावर या पाण्याने आपल्या केसांना क्लीन करा. या वेळी बोटांनी स्कॅल्पला मसाज देखील करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा दिसून येईल.

हेही वाचा :  ऋजुता दिवेकर यांनी सांगितले Weight Loss करताना त्वचेची काळजी कशी घ्याल

(वाचा :- सुरकुत्या सोडाच सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या चेह-यावर नाही एकही डाग, वयाच्या 61ठी मध्ये लांबसडक व घनदाट केसांसाठी करते ‘हा’ 1 उपाय!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास …

Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

Shirur Lok Sabha constituency: राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अजितदादांचे खास… विलास लांडेंच्या (Vilas Lande) वाढदिवसानिमित्त …