या चित्रात जे दिसेल त्यावरून ठरेल तुमचा स्वभाव..तंतोतंत जुळतोय अंदाज..पाहा तुम्हाला काय दिसतंय?

Opticall illusion: व्यक्ती तितक्या वल्ली असं म्हटलं जात,  प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. (optical illusion what you see first will tell your exact nature)

प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे असतात, पण बऱ्याचदा आपण काय विचार करतो यावरून आपला काय स्वभाव ठरतो किंवा त्यामागे काय लॉजिक असू शकत हे आपल्याला माहित नसत. 

अशा वेळी दृष्टिभ्रम अर्थात ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणारी पेंटिंग तुमच्या व्यक्तिमत्त्वातल्या छुप्या पैलूंवर प्रकाश टाकू शकतील.

सोशल मीडियावर सध्या एक पेंटिंग शेअर केलं गेलंय. असं सांगितलं जातंय, की तुम्ही ते पेंटिंग पाहिल्यावर तुम्हाला जी गोष्ट पहिल्यांदा दिसेल, त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे छुपे कंगोरे  समोर येतील. 

ऑप्टिकल इल्युजन निर्माण करणाऱ्या या पेंटिंगद्वारे (Optical illusion painting) तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बर्‍याच गोष्टी समोर येऊ शकतात . मिया यिलिन ही टिकटॉक स्टार (tiktok) आहे.

मिया यिलीन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (instagram account)  एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिने या पेंटिंगविषयी काही गोष्टींवर आपलं मत व्यक्त केलं आहे. तिने सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत जुळताना दिसतायत.

हेही वाचा :  हिंगोली हादरली! वडिलांचे हातपाय बांधून मुलाचा आईवर अत्याचार; समोर आलं धक्कादायक कारण

सुरवातीला जेव्हा तुम्ही पेंटिंग पाहता तेव्हा तुम्हाला यात बऱ्याच गोष्टी दिसतील. गवताने वेढलेला एक मोठा दगड, समुद्र, झाड आणि ढग आदी गोष्टी आहेत. तुम्ही लक्षपूर्वक पेंटिंग पाहिल्यास तुम्हाला विविध चेहरे दिसतील आणि यातच खरी गम्मत लपलेली आहे. (optical illusion what you see first will tell your exact nature)

पहिल्यांदा आई-बाळाचा चेहरा दिसला असल्यास…

पेंटिंग पाहताना तुम्हाला आई-बाळाचा चेहरा सर्वप्रथम दिसला असेल तर तुम्ही एक सहृदय व्यक्ती आहात. अतिशय संवेदनशील आहात. तुम्हाला वादविवाद, तंटे, मतभेद आवडत नाहीत. यामुळे तुम्ही या गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्नशील असता. अशी माणसं शांत, संयमी प्रवृत्तीची असतात. 

पहिल्यांदा तुम्हाला झाडात एका माणसाचा चेहरा दिसला तर.
अशी माणसं नेहमीच इतरांना आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत पाहण्यास उत्सुक असता. दुसर्‍याचं भलं झालेलं त्यांना पाहावत नाही;  पण या व्यक्तींची जमेची बाजू म्हणजे  अशा व्यक्ती स्वतःसाठी एक ध्याय आखून ठेवतात, ते ध्येय साध्य करण्यात अनेक कठोर समस्यांचा सामना ते करतात.  (optical illusion what you see first will tell your exact nature)

या व्यतिरिक्त अनेक गोष्टी या चित्रात लपलेल्या आहेत  यासाठी तुम्हाला खूप बारकाईने हे चित्र पाहावं लागणार आहे. लक्षपूर्वक पाहिल्यास डाव्या बाजूला समुद्राच्या पाण्यात एका माणसाचा चेहरा दिसतो. तसंच आई-बाळाच्या चेहर्‍यामध्ये उभं असलेलं झाड म्हणजे हिरव्या कपड्यातली महिलाच दिसतेय. ती एका डान्सची स्टेप करतेय अस वाटतंय. यामुळे नेटिझन्सनी त्याला डान्सिंग ट्री म्हटलं आहे. (optical illusion what you see first will tell your exact nature)

हेही वाचा :  Sarkari Naukri : TMC मध्ये नोकरीची सूवर्णसंधी, 53 हजार पगार... पाहा कसा कराल अर्ज!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …