HR सोबत कसं करावं पगाराचं Negotiation? ‘ही’ चूक अजिबात करु नका

Salary Negotiation with HR : अमुक एका ठिकाणी तमुक वर्षे काम केल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या नव्या नोकरीच्या शोधासाठी प्रयत्न करु लागतो तेव्हा आपल्याला सहजपणे काही संधी मिळतात. (Interviews) मुलाखती आणि चर्चांच्या फेऱ्या होतात. औपचारिकताही पूर्ण होतात. पण, मुद्दा अडतो तो एकाच गोष्टीवर आणि तो टप्पा म्हणजे पगाराचा. एचआर (HR) मंडळींशी पगाराची बोलणी करत असताना. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे पगाराविषयी बोलत असताना सर्वप्रथम तुमची निवड होणाऱ्या पदासाठी त्या क्षेत्रात त्या क्षणाला किती पगार मोजला जात आहे ते पाहा. (How to negotiate salary with HR while changing a job)

एचआरनं संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून तातडीनं प्रस्ताव स्वीकारण्यासाठीची विचारणा होते. पण, अतीघाईत प्रस्ताव स्वीकारण्याची चूक करु नका. 

पगाराविषयीच्या चर्चा करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? 

– तुम्हाला कोणा वरिष्ठांशी चर्चा करायची असल्यास तो अपेक्षित वेळ नजरेसमोर ठेवा. तातडीनं Offer स्वीकारू नका. 
– तुमचा अनुभव आणि कार्यक्षमता जास्त असल्यास निर्धास्तपणे मनाजोग्या पगारवाढीसाठी आग्रही राहा. 
– जुन्या नोकरीच्या (Job) पगाराच्या आधारे स्वत:विषयी पूर्वग्रह बांधू नका. नव्या कंपनीत तुम्हाला महत्त्वाचं पद आणि अपेक्षित पगार मिळूही शकतो. 
– तुम्ही सध्या काम करत असणाऱ्या कंपनीकडून अपेक्षित पगार (मागणी करूनही) मिळत नसल्यास नोकरी सोडणं योग्य पर्याय. कारण करिअरच्या नव्या वाटा शोधणंही तितकंच महत्त्वाचं. 
– (HR Department) एचआरकडून पगाराबाबत चर्चा करताना स्पष्टपणे आपली मतं पुढे ठेवा. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवणं तुमचा हक्क आहे. 

हेही वाचा :  VASTU TIPS: या वस्तू घरात ठेवाल तर येईल दारिद्रय...ताबडतोब हलवा नाहीतर काढूनच टाका...

 

– (Salary) पगारवाढीसाठी नोकरी सोडत असाल तर याची कल्पना HR ला असूद्या. अपेक्षित पगारवाढ हवी असल्यास तुम्हाला आर्थिक गणितं अधिक स्पष्टपणे मांडावीच लागतील.
– पगारापैकी किती पैसे तुमच्या खात्यात येणार, किती पैसे PF खात्यात जाणार, बोनस, इंन्सेंटीव्ह्ज, ओटी, व्हॅरिएबल पे या सर्व गोष्टी एचआरशी बोलताना स्पष्ट करा. Written Form म्हणजेच मेल स्वरुपात ही माहिती HR कडून मागवून घ्या. 
– नव्या संस्थेबाबत कितीही आकर्षण असलं तरीही पगार आणि प्रस्तावाविषयीची चर्चा पूर्ण होईपर्यंत हातातील नोकरी सोडू नका. 
– पगारवाढीसोबतच HR सोबत आठवड्याच्या सुट्ट्या (week off), सुट्ट्यांसंदर्भातील संस्थेचे नियम (Paid leaves), भरपगारी सुट्ट्यांची गणितं आणि नोकरीचे तास हे सर्वकाही विचारून घ्या. 

नोकरी (Job News) बदलणं म्हणजे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं, अशा वेळी काही गोष्टी हातातून निसटतात, पण त्या निसटत असताना नव्यानं काही गोष्टी मिळतात याचा मनस्ताप वाटण्याऐवजी आनंद वाटणं कधीही उत्तम. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …