Amol Palekar in Hospital : ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीर्घकालीन आजारावर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पालेकर यांच्या कुटूंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

अमोल पालेकर यांची प्रकृती सुधारत आहे. आधीपेक्षा त्यांची तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी एबीपी लाईव्हला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली. त्या म्हणाल्या, “हा जुना आजार आहे. अमोल पालेकर यांना १० वर्षापूर्वी देखील धुम्रपानामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र, सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित आहे.”

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. परिक्षित प्रयाग म्हणाले, “अमोल पालेकर सुरुवातीला खूप अशक्त स्थितीत दाखल झाले होते. तेव्हा त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडली होती. नंतर त्यांना आयसीयूत हलवण्यात आलं.”

हेही वाचा : अमोल पालेकर यांची ‘छोटी सी बात’!

अमोल पालेकर यांनी तब्बल ५ दशके भारतीय चित्रपटसृष्टीत काम करून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी हिंदी आणि मराठीशिवाय इतरही अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. रजनीगंधा, छोटी सी बात, गोलमाल, चितचोर, नरम गरम, बातो बातो में या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरलेल्या आहेत. अमोल पालेकर यांनी दररोजच्या आयुष्यातील अडचणींमध्येही पुढे जाणाऱ्या मध्यमवर्गीय व्यक्तीची वास्तववादी भूमिका साकारण्याचं श्रेयही पालेकर यांना दिलं जातं.

हेही वाचा :  MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या कोणी केली? राजगडावरील 'तो' पुरावा ठरणार महत्त्वाचा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …