मी तापाने फणफणत होतो, बेशुद्ध पडलो आणि कधी नव्हे ते…; भुजबळांनी सांगितला जेलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग

Chhagan Bhujbal Jail Experience: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी जेलमधील दिवस आपण कसे काढले याच्या आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान जेलमध्ये असताना आपण एकदा तापाने फणफणत होतो. बेशुद्ध अवस्थेत आपल्याला रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं होतं अशी आठवण सांगितलं. ‘लोकसत्ता’ने घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी इतर अनेक आठवणीही जाग्या केल्या. 

“जेल म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते. ती काही आनंदयात्रा नसते. जेलमध्ये अडीच वर्ष राहावं लागतं तेव्हा जेल म्हणजे काय कळतं. जेलमध्ये दुख, अडचणी असतात. पण जेलमध्ये सर्वात जास्त सहकार्य कोणाचं मिळत असेल तर पुस्तकं आणि वृत्तपत्रांचं होतं. नेहरु, महात्मा गांधी, जिना, हिटलर यांसह सर्वांची पुस्तकं मी वाचून काढली. महत्त्वाचं असेल त्याच्या खाली अधोरेखित करायचो. मध्यंतरी पुस्तकं वाचण्याची संधी नव्हती. यानिमित्ताने ती मिळाली असं समजून वाचायला घेतली होती,” असं भुजबळांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले “मुलं, सूनबाई पुस्तकं शोधून मला आणून देत होते. जे मिळत होतं ते वाचायचो. त्यात सकाळची संध्याकाळ कधी व्हायची हे कळायचं नाही. पण याच्यात तब्येतही बिघडायची. दोन तीन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकदा तर बेशुद्ध पडलो होतो. तीन दिवस तापाने फणफणत होतो. रुग्णवाहिका कधी येत नाही, पण तेव्हा बराकपर्यंत आली होती. मला कधी रुग्णालयात नेण्यात आलं समजलच नाही”. 

हेही वाचा :  विश्लेषण : नवाब मलिक ठरले होते यापूर्वीही वादग्रस्त; तरीही राष्ट्रवादीसाठी का महत्त्वाचे?

भुजबळांना यावेळी त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “माझा राजकीय वारसदार पंकज, समीर आणि महात्मा फुले समता परिषदेचे सर्व कार्यकर्त आहेत”. 

“मनातून शिवसेना गेलेली नाही”

शिवसेना अजून माझ्या मनातून गेलेली नाही असं भुजबळांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांना कोणती शिवसेना असं विचारण्यात आलं असता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असं उत्तर दिलं. जे मातोश्रीवर राहत होते ते बाळासाहेब ठाकरे असं ते म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे माझ्या ह्रदयात आहेत आणि शरद पवार माझ्या शरिराच्या कणाकणात आणि विचारात आहे. दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोण आवडतं असं कोणी विचारलं तर मी शरदराव ठाकरे असं उत्तर देईन असं ते मिश्कीलपणे म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …