टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात, कधी, कुठं पाहाल पहिला टी20 सामना?

India vs New Zealand Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे.  भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत. या सर्वांना घेऊन कुंग फू पांड्या अर्थात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कर्णधार बनून मैदानात उतरणार आहे. भविष्यातील टी20 सामन्यांच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघात बदलाची शक्यता असून या मालिकेतून खेळाडूंचा खेळ तपासण्याची संधी बीसीसीआयकडे आहे. दरम्यान आज होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ…

कधी होणार सामना?

भारतीय वेळेनुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

Reels

आजचा हा भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला टी20 सामना वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

हेही वाचा :  IND vs SL Test : विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना, रोहित शर्मासाठीही महत्त्वाचा दिवस

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

कसं आहे टी-20 मालिकेच वेळापत्रक?







सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर वेलिंग्टन
दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर माउंट मॉन्गनुई
तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर नॅपियर

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …