विवस्त्र प्रवेश देणारे जगातले सर्वात विचित्र Restaurant; यादीतील दुसरं नाव पाहून हडबडून जाल

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपण कायमच काही गोष्टींवर विशेष लक्ष देतो. आपले कपडे हासुद्धा त्याचाच एक भाग. पेहरावाच्या बाबतीत कायमच आपण सर्वजण सजग असतो. पण, तुम्हाला कोणी म्हटलं सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र या तर? 

हे ऐकायलाच तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल. पण, लंडनमध्ये एक असं Restaurant आहे. जिथं लोक कपडे काढून जेवण जेवतात. 

‘दी बुनियादी’ ( Nude Restaurant, London)  या नावाने ओळखलं जाणारं हे आहे जगातील पहिलं न्यूड रेस्तराँ. 

2016 मध्ये याची सुरुवात झाली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण इथं शेफ, वेटरसह सर्वजण विवस्त्रच खाणं शिजवतात, हे वाढतात आणि खाणारेही ते विवस्त्रच खातात. 

न्यूड रेस्टोरेंट, लंदन

न्योताईमोरी (Nyotaimori or Naked-Sushi Restaurants, Japan) म्हणजेच एका स्त्रीच्या शरीरावर वाढलेलं जेवण. या हॉटेलमध्ये बॉडी सुशी देण्यात येते. 

जिथं सुशी सा हा पदार्थ चक्क काही तरुणींच्या शरीरावर ठेवून वाढण्यात येतो. त्या मुलींच्या चारही बाजूंना बसून लोक या पदार्थाचा आनंद घेतात. जपानमधील ही पद्धत बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. 

न्योताईमोरी रेस्‍टोरेंट, जापान

Prison Theme Restaurant, China चीनमधील हे रेस्तराँ तेथील खास सेवेसाठी प्रसिद्ध आहे. इथं एका कारागृहात तुम्हाला जेवण दिलं जातं. वेटर आणि इतर मंडळी अथं कैदी आणि जेलरच्या रुपात वावरत असतात. 

हेही वाचा :  Israel Attack : 'तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा...', हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

प्रिजन रेस्टोरेंट, चीन

सहसा वॉशरुमचा वापर कोणत्या गोष्टींसाठी होतो हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, तैवानमध्ये एक असं हॉटेल आहे, जिथं तुम्हाला खुर्चीवर नाही, तर टॉयलेट सीटवर बसवण्यात येतं. तिथेचट बसून तुम्ही जेवणाचा आनंद घेणं अपेक्षित असतं. 

टॉयलेट रेस्टोरेंट, तायवान

(Restaurant In Air, Belgium) बेल्जियममधील एक हॉटेल असं आहे, जे हवेत तरंगत म्हणा किंवा लटकत म्हणा पण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आहे की नाही, एकदम जगावेगळा अनुभव? 

रेस्टोरेंट इन एयर, बेल्जियम



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …