IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तरतालिका जाहीर, ‘येथे’ करा डाऊनलोड

IGNOU PhD Entrance Exam Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) पीएचडी प्रवेश परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका आणि प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. एनटीएने २४ फेब्रुवारी रोजी देशभरातील ३० शहरांमध्ये कॉम्प्युटर आधारित (CBT) माध्यमातून पीएचडी प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.

उत्तरतालिकेमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप नोंदविण्यासाठी ९ मार्च रात्री ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांना प्रति आक्षेप २०० रुपये शुल्क भरावे लागेल. आक्षेप नोंदवताना सोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे केली जाईल. आक्षेप योग्य आढळल्यास उत्तरतालिकेमध्ये बदल करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन इग्नू पीएचडी प्रवेशाची तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे.

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती
IGNOU PhD Entrance Exam Provisional Answer Key: अशी करा डाऊनलोड
स्टेप १: सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट ignou.nta.ac.in वर जा.
स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या उत्तरतालिकेवर क्लिक करा.
स्टेप ३: आता अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
स्टेप ४: तुमची उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल.
स्टेप ५: आता ते तपासा आणि डाउनलोड करा.

हेही वाचा :  NIFT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदविण्यासाठी 'येथे' क्लिक करा

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
एनटी इग्नू पीएचडी हेल्पलाइन(NTA IGNOU PhD Helpline)
इग्नू पीएचडी प्रवेश किंवा प्रवेश परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्यासाठी, तुम्ही एनटीएद्वारे जाहीर केलेल्या इग्नू हेल्पलाइन ०११-४०७५९००० नंबरवर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही [email protected] वर ईमेल पाठवून देखील संपर्क साधू शकता.

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …